Weight Loss Tips: एका आठवड्यात वजन झटपट घटविणारा प्रभावी डाएट प्लॅन

Effective diet plan to lose weight : डाएट प्लॅनच्या मदतीने एका आठवड्यात वजन झटपट कमी करणे शक्य आहे. हा डाएट प्लॅन अंमलात आणण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

Effective diet plan to lose weight
Weight Loss Tips: एका आठवड्यात वजन झटपट घटविणारा प्रभावी डाएट प्लॅन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Weight Loss Tips: एका आठवड्यात वजन झटपट घटविणारा प्रभावी डाएट प्लॅन
  • डाएट प्लॅन व्यवस्थित अंमलात आणल्यास एक आठवड्यात किमान ३ ते ४ किलो वजन कमी होऊ शकते
  • डॉक्टरांनी परवानगी दिल्याशिवाय डाएट प्लॅन अंमलात आणू नका

दीर्घ काळ एका ठिकाणी बसून काम करणे, तेलकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड यांच्या सेवनामुळे वजन वेगाने वाढते. लठ्ठपणामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा त्रास होऊ लागतो. एखादा गंभीर आजार झाला की एकदम वजन कमी करण्याची घाई सुरू होते. अशा लठ्ठपणाने त्रस्त असलेल्यांसाठी एक उपयुक्त डाएट प्लॅन. या डाएट प्लॅनच्या मदतीने एका आठवड्यात वजन झटपट कमी करणे शक्य आहे. हा डाएट प्लॅन अंमलात आणण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

एका आठवड्यात झटपट वजन कमी करणारा डाएट प्लॅन

नाश्ता

  1. दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी पिऊन करा
  2. एक ग्लास कोमट पाण्यात एक-दोन चमचे लिंबूरस मिसळून ते पाणी पिणे जास्त फायद्याचे
  3. नाश्ता म्हणून ताजी फळे, मर्यादीत प्रमामात सुका मेवा खा. एक ग्लास कोमट दूध प्या. 
  4. कमी तेलाचा वापर करून तयार केलेले पोहे अथवा पराठा खाऊ शकता

दुपारचे जेवण

  1. ताजे सकस अन्न खा
  2. जास्तीत जास्त भाज्या आणि सॅलड खा
  3. डाळीचे वरण किंवा आमटी, एक छोटी वाटी दही खाऊ शकता
  4. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकऱ्या खा
  5. लोणचं, सॉस, मेयॉनीज, चीझ, बटर, पापड खाणे टाळा

संध्याकाळी ग्रीन टी

  1. संध्याकाळी चार वाजता एक कप ग्रीन टी प्या. ग्रीन टी मध्ये साखर टाकू नका.

रात्रीचे जेवण

  1. रात्री सूर्यास्ताआधी जेवण जेवून घ्या.
  2. शक्यतो सॅलड आणि सूप यांच्यावरच भर द्या.
  3. जास्त भूक असल्यास 
  4. भाजी, डाळीचे वरण किंवा आमटी खाऊ शकता
  5. वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे

तांदुळापासून तयार केलेला भात जेवल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. पण भात हा पदार्थ लठ्ठपणा वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. जे जास्त शारीरिक श्रम करत नाहीत त्यांचे वजन भात खाण्याने वाढण्याचा धोका असतो. 

तज्ज्ञांनी सुचविलेला हा डाएट प्लॅन व्यवस्थित अंमलात आणल्यास एक आठवड्यात किमान ३ ते ४ किलो वजन कमी होऊ शकते. पण हा डाएट प्लॅन अंमलात आणण्याआधी वैद्यकीय तपासणी करून घ्या तसेच डॉक्टराचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी परवानगी दिल्याशिवाय डाएट प्लॅन अंमलात आणू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी