अंड्याबाबतचे हे आहेत गैरसमज

तब्येत पाणी
Updated Mar 28, 2019 | 23:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

अंडी ही रोजच्या आहारात महत्त्वाचा प्रोटीनचा स्त्रोत असतो. अनेक कलाकारांच्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश हा असतोच.

egg
अंडी 

मुंबई  : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं म्हटलं जातं. अंडे हा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. यात प्रोटीन, व्हिटामिन ए, बी२, बी६, बी१२ आणि डी, झिंक, आर्यन आणि कॉपर ही पोषणतत्वे असतात. अंडी खाल्ल्याने शरीरास प्रोटीन मिळते. यामुळे एनर्जीही मिळते. अंड्याचे पदार्थ झटपटही करता येतात त्यामुळे करायलाही सोपे. तुमच्याही मनात जर अंडी खाण्याबाबत काही गैरसमज असतील तर ते वेळीच दूर करा. 

अंड्यामुळे पिंपल्स येतात

हा समज चुकीचा आहे. अंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर अथवा कुठेही पिंपल्स येत नाही. हा जर तुम्हाला अंड्याची अॅलर्जी असेल तर त्रास होऊ शकतो नाही तर नाही. 

अंड्याचा पांढरा भाग किडनीसाठी नुकसानदायक

अनेकांना वाटते की अंड्याचा पांढरा भाग खूप खाल्ल्याने किडनी खराब होऊ शकते. मात्र हे खरे नाही आहे. याउलट प्रोटीन जास्त प्रमाणात घेतल्यास किडनीशी संबंधित आजार होत नाहीत. 

अंडी केवळ फिटनेस फ्रीक लोकांसाठी

अंडी कोणीही खाऊ शकतात. एका वर्षाच्या बाळापासून ते ६० वर्षांच्या म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत. अंडी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. त्यामुळे केवळ फिटनेस फ्रीक लोकांनीच नव्हे तर कोणीही अंडी खावीत.

अंडी कितीही खा

अंडी किती खावीत यासाठी कोणतेच नियम नाहीत. तुमच्या शरीराच्या प्रोटीन आणि फॅटच्या गरजेनुसार तुम्ही अंडी खाऊ शकता. मात्र कोणतीही गोष्ट अति खाऊ नये नाहीतर त्रास होतो.

अंड्याचा पिवळा बलक आरोग्यासाठी चांगला नाही

अंड्याचा पिवळा बलक हा आरोग्यासाठी चांगला नाही असं म्हणतात. मात्र तसे नाहीये. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि प्रोटीन असतात ज्यामुळे ते जास्त खाऊ नये असा सल्ला दिला जातो. 

अंडी नेहमी फ्रीजमध्ये ठेवावीत

अंडी नेहमी फ्रीजमध्येच ठेवली पाहिजे असे काही नसते. त्या त्या प्रदेशानुसार अंड्याची साठवणूक केली जाते. अमेरिकन अंडी ही नेहमी फ्रीजमध्येच ठेवावी लागतात. इतर देशांतील अंडी फ्रीजच्या बाहेरही राहू शकतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी