Elaichi Benefits For Mens: पुरुषांसाठी वरदान आहे इलायची, या वेळेत करावं लागेल सेवन

इलायची (Elaichi ) चा वापर चहामध्ये (Tea) आणि जेवणात सुगंध आणि चव वाढवण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की पुरुषांना (Men) याचा आश्चर्यकारक फायदा होतो. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात (married life) समस्या येत असतील तर काळजी करण्याची गरज नाही. कारण याचा तुम्हाला फायदा होईल,

Elaichi Benefits For Mens
Elaichi Benefits For Mens: पुरुषांसाठी वरदान आहे इलायची  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्या पुरुषांमध्ये स्टॅमिना कमी आहे ते पुरुष देखील इलायचीचे सेवन करावे.
  • पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 वेलची खावी.

Elaichi Benefits For Mens: इलायची (Elaichi ) चा वापर चहामध्ये (Tea) आणि जेवणात सुगंध आणि चव वाढवण्यासाठी केला जातो. रक्तविकार (blood disorder), तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला (Dry cough), मूत्रविकार, डोळय़ांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार, शरीराचा दाह,  आर्तवविकार, मुखविकार इत्यादी विविध विकारांत वेलचीचा उपयोग केला जातो. या वेलचीचा पुरुषांना (Men) याचा आश्चर्यकारक फायदा होतो. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात (married life) समस्या येत असतील तर काळजी करण्याची गरज नाही. कारण याचा तुम्हाला फायदा होईल, ज्या पुरुषांमध्ये स्टॅमिना कमी आहे ते पुरुष देखील याचे सेवन करू शकतात. या इलायचीचे इतर काय फायदे होतात याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.. 

  • पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते.
  • त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.
  • वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. यामुळे दमा, तीव्र सर्दी आणि खोकला यासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
  • आयुर्वेदात वेलची उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते.
  • वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहील

पुरुषांनी या वेळेत खावी वेलची 

पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 वेलची खावी. रोज वेलची खाल्ल्याने पुरुषांमधील नपुंसकता दूर होते. कारण वेलची लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. तुम्ही ते पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला याचा फायदाच मिळेल.

Read Also : कारागृह अधिक्षकाची चुकी महिला कैद्यांना पडली भारी

वेलचीमध्ये हे गुणधर्म असतात

वेलचीमध्ये आढळणारे घटक बघितले तर त्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस आढळतात. जे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे अशा स्थितीत पुरुषांनी याचे सेवन नक्की करावे.

Read Also : कोण असतील देशाचे राष्ट्रपती सिन्हा की द्रौपदी मुर्मूं?

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अंमल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी