चमकी ताप म्हणजे काय? जाणून घ्या त्याची लक्षणे, कारणं आणि त्यावरील उपाय 

तब्येत पाणी
Updated Jun 18, 2019 | 22:27 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

चमकी तापः बिहारच्या मुजफ्परपुर जिल्ह्यात चमकी तापाची साथ पसरली आहे. चमकी ताप हा १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना होतो. चमकी तापाची लक्षणे, त्याची कारणं आणि त्याच्यापासून कसा बचाव करावा याबाबत जाणून घ्या. 

chamki fever
चमकी ताप म्हणजे काय? जाणून घ्या त्याची लक्षणे, कारणं आणि त्यावरील उपाय  

मुंबईः बिहारमध्ये चमकी तापामुळे आतापर्यंत १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे. चमकी तापाला मेंदूचा ताप आणि जपानी ताप या नावानं देखील ओळखलं जातं. चमकी तापाला डॉक्टरांच्या भाषेत एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम (एईएस) असं म्हटलं जातं. आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या गोरखपुर आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मेंदूचा तापामुळे मुलांचा मृत्यू होण्याचं प्रकरण समोर आलं होतं. मात्र पहिल्यांदा बिहारच्या मुजफ्फरपूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये चमकी तापानं रौद्र रूप धारण केलं आहे. चमकी ताप म्हणजे नेमकं काय आहे आणि याची लक्षणे काय आहेत. या तापापासून कसं बचाव करता येईल. याबद्दल जाणून घ्या. 

हा ताप साधारणपणे गरमी किंवा उष्णतेच्या दरम्यान ० ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना होतो. हा ताप जास्तकरून कुपोषित असलेल्या मुलांना होता. काही प्रकरणात चमकी तापाचं कारण पौष्टिक अन्न न खाणं हे देखील आहे. धक्कादायक म्हणजे, बराच काळ झाल्यानंतरही  वैद्यकीय तज्ज्ञांनी या आजारासंबंधी कोणतीही ठोस कारणं शोधू शकली नाही आहेत. असं म्हटलं जातं की, चमकी किंवा मेंदूचा ताप झाल्यास मुलांमध्ये शुगर आणि सोडियमची कमतरता होते. उपचारांमध्ये विलंब झाल्यामुळे मुजफ्फरपूरमध्ये मुलांचा मृत्यू झाला आहे. 

चमकी ताप (एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोम)ची  कारणं 

 • डोक्यामध्ये ताप गेल्यास हा आजार होतो. मेंदूच्या पेशी आणि नसाना सूज आल्यास मेंदूचा ताप येतो. मेंदूतला ताप सांसर्गिक नाही. मात्र ताप पसरवणारा व्हायरस संसर्गजन्य होण्याची शक्यता असते. 
 • एक्यूट इंसेफलाइटिस याचं मुख्य कारणं व्हायरस मानले जाते. यातील काही व्हायरसचे नाव हर्प्स व्हायरस, इंट्रोव्हायरस, वेस्ट नाइल, जपानी इंसेफलाइटिस, इस्टर्न इक्विन व्हायरस, टिक-बोर्न व्हायरस आहेत. 
 • इंसेफलाइटिस बॅक्टेरिया, फुंगी, परजीवी, रसायन, टॉक्सिनमुळे देखील पसरतो. भारतात एक्यूट इंसेफलाइटिस सिंड्रोमचं मुख्य कारण जपानी व्हायरस असल्याचं मानलं जातं. याव्यतिरिक्त निपाहा आणि जिका व्हायरस देखील इंसेफलाइटिसचं कारण बनू शकतं. 

चमकी तापाची लक्षणे 

 1. अति ताप
 2. उलट्या
 3. डोकेदुखी
 4. उष्णतेमुळे चिडचिडपणा
 5. गोंधळ
 6. मान आणि पाठ दुखणे
 7. मळमळ
 8. दैनंदिन स्वभावात बदल
 9. बोलण्यात आणि ऐकताना त्रास होणं
 10. वाईट स्वप्न
 11. आळशीपणा
 12. स्मृतीत कमजोरपणा
 13. गंभीर स्थितीत लकवा मारणं आणि कोमाची स्थितीत

चमकी तापामुळे हे लोकं होतात प्रभावित

चमकी ताप किंवा इंसेफलाइटिस साधारणपणे १५ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांना होतो. हा ताप उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात म्हणजेच बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडू मधील काही भागामधील मुलांना आपल्या निशाणा बनवत आलं आहे. 

चमकी तापाचे उपचार 

 1. चमकी तापानं पीडित मुलांना वेळ न घालवता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. मुलांवर उपचार हे आयसीयूमध्ये करावं असा प्रयत्न असवा. 
 2. मेंदूत सुज पसरण्यापासून रोखण्यासाठी मुलांवर बरोबर देखरेख असावी. डॉक्टरांनी मुलांचं ब्लड प्रेशर, हर्ट रेट, श्वसनाचा तपास करत राहावं
 3. काही इंसेफलाइटिसचा उपचार एन्टी व्हायरल ड्रग्सनं सुद्धा केलं जाऊ शकतं. 
 4. मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना ओआरएसचे पाणी पाजावं. 
 5. जास्त ताप आल्यानं पूर्ण शरीर ताज्या आणि थंड पाण्यानं पुसून घ्या. 
 6. बेशुद्द झाल्यानं मुलांना हवेदार ठिकाणी घेऊन जा. 
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
चमकी ताप म्हणजे काय? जाणून घ्या त्याची लक्षणे, कारणं आणि त्यावरील उपाय  Description: चमकी तापः बिहारच्या मुजफ्परपुर जिल्ह्यात चमकी तापाची साथ पसरली आहे. चमकी ताप हा १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना होतो. चमकी तापाची लक्षणे, त्याची कारणं आणि त्याच्यापासून कसा बचाव करावा याबाबत जाणून घ्या. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola