Men Tests After 30 । मुंबई : प्रत्येक व्यक्तीचे वय वाढत जाते तसतशी ती व्यक्ती आजारांच्या जवळ जाऊ लागते. खासकरून वयाच्या ३० वर्षानंतरच हे होऊ लागते. अशा परिस्थितीत पुरुषांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे पुरुष काही आरोग्य तपासणी करून रोगांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. चला तर म जाणून घेऊया वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने करायच्या काही चाचण्या. (Every man should get this test after the age of 30).
अधिक वाचा : 'गांधी कुटुंबाला हात लावल्यास देशभरात जेलभरो आंदोलन करणार'
डायबिडीज (Diabetes) - डायबिटीज हा काही सामान्य आजार नाही, यामुळे तुम्ही इतर अनेक आजारांना बळी पडू शकता. डायबिटीजच्या या चाचणीवरून तुम्हाला डायबिटीज आहे की नाही याची माहिती मिळते. अशाप्रकारे, जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही त्यावर वेळीच नियंत्रण ठेवू शकता.
एचआयव्ही (HIV) - एचआयव्हीला या चाचणीसाठी सर्वोत्तम मानले जाते. कारण ही एक साधी रक्त तपासणी आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या चाचण्या करता येतात. पुरुषांनी दर ५ वर्षांनी याची चाचणी करून घ्यावी.
टेस्टिक्युलर कॅन्सर (Testicular Cancer) - टेस्टिक्युलर कॅन्सर हा २० ते ३९ वयोगटातील पुरुषांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य आजार आहे. जर या आजाराची वेळेपूर्वी माहिती मिळाली तर यावर सहज मात करता येत. जरी वेदना आणि सूज ही एकमेव लक्षणे असली तरी, तुम्ही त्याची तपासणी केली पाहिजे. तुम्ही तुमच्या अंगठ्याद्वारे आणि अनामिकेद्वारे गाठ तपासू शकता. लक्षणीय बाब म्हणजे ही गाठ सहसा वाटाण्यासारखी असते. म्हणूनच पुरुषांनी दर महिन्याला याची तपासणी करून घ्यावी.
कोलेस्टेरॉल (Cholesterol) - कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जाते.म्हणून जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाची नियमित तपासणी करून घ्यावी. यावरून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची माहिती मिळेल.
दातांची तपासणी - दातांच्या समस्या आणि हृदयविकाराचा थेट संबंध आहे. जेव्हा तोंडात असलेले बॅक्टेरिया रक्ताद्वारे शरीरात जातात, तेव्हा ते हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण करू शकतात. म्हणूनच पुरुषांनी वर्षातून दोनदा तपासणी केली पाहिजे.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.