Health Tips : नवी दिल्ली : हळद (Turmeric) हा एक असा मसाला आहे, जो भारतातील प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध आहे. प्रत्येक भारतीय घरात हळदीचा वापर केला जातो. अनेकदा आपण त्याच्या फायद्यांबद्दल ऐकतो, कारण ते प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांसाठी (Ayurved) ओळखले जाते. पाहिले तर इतर अनेक प्रकारचे मसाले आहेत, पण हळदीची गणना सर्वात प्रसिद्ध मसाल्यांमध्ये केली जाते. त्याचबरोबर हळद अतिशय औषधी आणि गुणकारी म्हणूनही ओळखली जाते. ताज्या जखमा सुकवण्यासाठी रात्रीच्या वेळी दुधासोबत याचे सेवन केले जाते. तसेच उच्च रक्तदाब आणि एलडीएल, रक्त प्रवाह, शरीरातील पेशी तुटणे यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु तुम्हाला त्याचे नुकसान माहित आहे का?हळदीचे अतिरिक्त सेवनदेखील चांगले नसते. चला जाणून घेऊया, त्याचे जास्तीचे सेवन आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते. (Excess use of turmeric is harmful to health, may invite these diseases)
अधिक वाचा : Dark Circles :डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे वैतागला आहात? या घरगुती उपायांनी चटकन होईल सुटका
हळदीमुळे अनेक प्रकारचे आजार आणि विकार दूर होण्यास मदत होते. हळदीचं नियमित सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. जर हळद दुधात मिसळून घेतली, तर त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक परिणाम होतो आणि सर्व प्रकारच्या ॲलर्जीशी लढण्यासाठी शरीर तयार होतं. जर तुम्हाला धुळीपासून ॲलर्जी होण्याचा त्रास असेल तर दररोज एक कप कोमट दुधात हळद मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र हळदीच्या अतीसेवनाने तुम्ही काही आजारांना आमंत्रण देऊ शकता. पाहूया हळद अती प्रमाणात घेतल्याने कोणते आजार होऊ शकतात.
अधिक वाचा : Heart Health: हे लाल-गोड फळ आहे हृदयाचे मित्र...यामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका
हळदीचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जर आपण तिच्या फायद्यांचा विचार करून तिचे अधिक प्रमाणात सेवन केले तर त्यात असलेल्या ऑक्सलेटच्या प्रमाणामुळे आपल्या शरीरात खडे तयार होऊ लागतात आणि आपल्याला मूतखड्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. म्हणून, सेवन करण्यापूर्वी, त्याचे प्रमाण जाणून घ्या, त्यानुसार सेवन करा.
अनेकदा बाहेरच्या अन्नामुळे जुलाब होत नाही, पण जास्त हळद खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते, कारण त्यात कर्क्युमिन असते, जे आपल्या पोटातील गॅस्ट्रिक डक्टला व्यवस्थित काम करण्यापासून रोखते, ज्यामुळे डायरियाची समस्या सुरू होते.
अधिक वाचा : Super Foods : आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी पाच आश्चर्यकारक सुपरफूड...आठवड्यातून दोनदा खा आणि जादू पाहा...
शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह आजकालच्या खाण्यापिण्यातून आपल्या शरीराला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आजारांनी घेरले आहे, शरीरात लोह कमी असल्याने रक्ताची कमतरता जाणवते. परंतु हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील लोह कोरडे होऊ लागते, ज्यामुळे अशक्तपणासोबतच इतर समस्याही वाढू शकतात.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)