Lemon Water Side Effects लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन ठरू शकते हानीकारक

Excess Lemon Water may damage body लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन शरीराला हानीकारक ठरू शकते. यामुळे लिंबू पाणी मर्यादीत प्रमाणात पिणे आरोग्यास गुणकारी आहे हे लक्षात ठेवा.

Lemon Water
लिंबू पाणी 
थोडं पण कामाचं
  • लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन ठरू शकते हानीकारक
  • लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास डीहायड्रेशनचा धोका
  • लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास अॅसिडिटीचा धोका

List of Lemon Water Side Effects लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. क जीवनसत्व (C Vitamin) मिळते. रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. अपायकारक घटक शरीराबाहेर टाकण्यास लिंबू पाणी मदत करते. पण लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन शरीराला हानीकारक ठरू शकते. यामुळे लिंबू पाणी मर्यादीत प्रमाणात पिणे आरोग्यास गुणकारी आहे हे लक्षात ठेवा.

लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन शरीराला हानीकारक

  1. डीहायड्रेशन : लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची घसरलेली पातळी कमी होते. शरीर हायड्रेट होते. पण लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास वारंवार लघवी होते. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.
  2. जखमा : लिंबू पाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. पण लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास जुन्या जखमा लवकर भरुन येत नाहीत. काही जखमांमुळे होणारा त्रास वाढू शकतो.
  3. अॅसिडिटी (पित्त) : दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास शरीराची पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. पण ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांनी मर्यादीत प्रमाणात लिंबू पाण्याचे सेवन करावे. अन्यथा त्यांच्या पचनक्षमतेवर लिंबू पाण्याचा दुष्पपरिणाम होण्याचा धोका असतो. लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास अॅसिडिटी (पित्त) वाढण्याचा, गॅसेसचा त्रास वाढण्याचा धोका आहे.
  4. दात : लिंबू पाण्याचे अतिरिक्त सेवन केल्यास दात आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. 
  5. लक्षात ठेवा :  लिंबू पाण्याचे सेवन निरोगी राहण्यासाठी करायचे की नाही आणि करायचे असल्यास किती प्रमाणात याचा निर्णय प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी