वेलची (Cardamom), आले (ginger) घातलेला कडक चहा (tea) सर्वांनाच आवडतो. दिवसाची सुरुवात चहाचे घोट घेतच होते. मात्र हाच चहा आपल्या आरोग्यासाठी (health) धोकादायक (dangerous) ठरू शकतो. मर्यादित प्रमाणात चहा प्यायल्याने थकवा (fatigue), डोकेदुखी (headache) कमी होऊन ताजेपणा (freshness) मिळतो, पण जास्त चहा आपल्याला अनेक गंभीर समस्या (serious problems) देऊ शकतो. चहात अधिक प्रमाणात कॅफीन (caffeine) आणि टॅनिनसारखे (tannin) पदार्थ आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. जाणून घ्या किती चहा पिणे आरोग्यदायी आहे.
भारतात चहाची तलफ अनेकदा लोकांमध्ये दिसून येते. एका दिवसात 2 ते 3 कप चहा हा चालू शकतो, एका चहाच्या कपात साधारण 20 ते 60 ग्रॅम कॅफीन असते, चहाच्या कपावरून ही मात्रा बदलते. त्यामुळे अधिक कॅफीन शरीरात जाणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
चहात अधिक प्रमाणात टॅनिन असते. हे आपल्या शरीराची लोह शोषून घेण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे फार चहा घेऊ नये.
चहा हा अँटीबायोटिक औषधांचा प्रभाव कमी करतो. एका अहवालानुसार चहा किमोथेरपी, क्लोजापाईन औषधांचा परिणाम कमी करतो. जर आपण अँटीबायोटिक गोळ्या घेत असाल तर चहाचे सेवन करू नका.
खूप प्रमाणात चहा प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. चहा आपल्या पाचनसंस्थेचे संतुलन बिघडवतो ज्यामुळे पित्त, पोटात जळजळ अशा समस्या होऊ शकतात.
गर्भावस्थेत चहा महिलांसाठी घातक ठरू शकतो. चहातले कॅफीन पचवण्यास गर्भातील अर्भकाला समस्या येतात ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत चहा टाळा आणि प्यायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चहातल्या कॅफीनमुळे चक्कर येणे आणि अशक्तपणा वाढू शकतो.
चहा प्यायल्याने भले आपल्या हृदयाला आराम वाटत असेल, पण याचे अधिक प्रमाणात सेवन आजारांना आमंत्रण देते. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि हार्टबर्नचा त्रास होऊ शकतो.