Neck Fat Exercise: मानेवरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर व्यायाम, बसल्या बसल्या होईल टोनिंग

मानेभोवतीची चरबी कमी करणे सर्वात आव्हानात्मक असते. मात्र काही सोप्या उपायांनी तुम्ही हे साध्य करू शकता.

Neck Fat Exercise
मानेवरची चरबी करण्यासाठी फायदेशीर व्यायाम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मानेवरची चरबी होऊ शकते कमी
  • बसल्या बसल्या करु शकता व्यायाम
  • व्यायामात सातत्याची असते गरज

Neck Fat Exercise : शरीराचं वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) आपण अनेक प्रकारचे व्यायाम (exercise) करत असतो. मात्र मानेवर आणि चेहऱ्याभोवती साठणाऱ्या चरबीचं (Fats around neck) काय करायचं, ते अनेकांना माहित नसतं. त्यामुळेच अनेकदा पोटातील चरबी कमी झाली तरी मानेवरची चरबी मात्र कमी होत नाही. तसंही शरीरातील इतर कुठल्याही भागातील चरबीपेक्षा मानेभोवतीची चरबी कमी करणं हे जास्त आव्हानात्मक असतं. त्यासाठी सातत्यापूर्ण प्रयत्न करावे लागतात. मात्र काही विशिष्ट व्यायामांनी आणि संतुलित आहाराने मानेभोवतीची चरबी करणं आणि फेसकट पूर्ववत करणं सहज शक्य होतं. जाणून घेऊया त्यासाठीचे काही व्यायाम

फिश लिप्स

फिश लिप्स या प्रकारामुळे गाल आणि मानेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्याचं टोनिंगही चांगल्या प्रकारे होतं. हा व्यायाम करण्यासाठी तुमचे दोन्ही गाल आतल्या बाजूला ओढून घ्या. त्यामुळे तुमचा चेहरा आपाओपच माशाच्या आकाराचा होईल. त्यामुळे गालावरील चरबी वितळायला मदत होईल. थोडा वेळ याच अवस्थेत राहा आणि पुन्हा गाल पूर्ववत करा. दिवसातून काही वेळा हा व्यायाम करा आणि हळूहळू तो वाढवत राहा. 

बॉल एक्सरसाईज

या व्यायामाच्या नावातच उल्लेख असल्याप्रमाणे बॉलच्या मदतीने हा व्यायाम केला जातो. हा प्रकार करण्यासाठी एक टेनिस बॉल घ्या. एका खुर्चीवर रेलून बसा. तुमच्या हनुवटीखाली तो बॉल ठेवा. हनुवटीने तो बॉल पकडून ठेवा आणि गळ्यावर दाबून धरण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा 10 ते 15 सेकंद पकडून सोडून द्या. हळूहळू तुमची क्षमता वाढत जाईल. या व्यायामामुळे तुमची हनुवटी आणि गळ्याभोवतीची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. 

अधिक वाचा - Wrinkle Reducing Diet: सुरकुत्या कमी करण्यासाठी आजच या पदार्थांचा आहारात समावेश करा, मिळेल सुंदर त्वचा

नेक रोटेशन

सर्वप्रथम एका खुर्चीवर बसा. तुमची पाठ आणि कंबर एकदम ताठ ठेवा. त्यानंतर घड्याळ्याच्या दिशेने तुमची मान फिरवा. त्यानंतर घड्याळ्याच्या उलट्या दिशेने मान फिरवा. सुुरुवातील दोन ते तीन वेळाच हा व्यायाम करा आणि त्यानंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. यामुळे मानेच्या सर्व भागांना व्यायाम मिळतो आणि चरबी कमी होते. 

अधिक वाचा - Health Tips: हृतिक रोशनच्या आईचा भन्नाट फिटनेस, ६७व्या वर्षी मारतायेत पुशअप

पुशअप्स

हा व्यायाम मात्र तुम्हाला बसून करता येणार नाही. त्यासाठी आडवं व्हावं लागेल. हाताचे आणि पायाचे पंजे जमिनीवर टेकून पुशअप्सच्या अवस्थेत उभे राहा. गुडघे टेकू नका. पाय ताठ राहू द्या. आता हात कोपऱ्यात वाकवत हळूहळू शरीर जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे सुरुवातीला जमतील तेवढेच पुशअप्स करा. यामुळे मानेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते आणि स्ट्रेंथ वाढायलाही मदत होते. 

डिस्क्लेमर - मानेभोवतीची चरबी कमी करण्यासाठीचे हे घरगुती उपाय आहेत. तुम्हाला मानेसंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी