Over Exercising Side Effects:सदृढ शरीरयष्टी आणि निरोगी ( healthy) आरोग्यासाठी आपण व्यायाम करत असतो. त्यामुळे अनेकांना असा भ्रम असतो जास्त व्यायाम केला तर आपली शरीरयष्टी आणि आरोग्य अधिक चांगली होईल. परंतु तसं खरं नाहीये, पुरेशा प्रमाणात व्यायाम केला तरच फायदा होतो, जास्त व्यायाम केल्यास त्याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
अधिक वाचा : वारंवार जांभई येते, मग हे असू शकतात मोठ्या आजारांचे संकेत
शरीर तंदुरुस्त ठेवणे हा व्यायामाचा उद्देश आहे. जास्त व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त न राहता शरीर थकत असते. जास्त व्यायामामुळे हृदयविकार, झोपेची समस्या, भूक न लागणे अशा समस्या सुरू होतात. म्हणूनच व्यायाम करण्यापूर्वी शरीराची गरज आणि क्षमता समजून घेतली पाहिजे. ठराविक मर्यादेत व्यायाम करून शरीराला हानीपासून वाचवता येते. जाणून घेऊया जास्त व्यायामामुळे काय समस्या येतात.
अधिक वाचा : पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मामध्ये किती अंतर ठेवाल
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर कोणी जास्त व्यायाम करत असेल तर त्याला स्नायूं ओढल्यासारखं आणि असह्य वेदना होऊ शकते. उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे, स्नायू पूर्णपणे सक्रिय होतात आणि त्यामध्ये अधिक ताणले जाते, ज्यामुळे शरीरावर अधिक दबाव येतो आणि वेदना होण्याची शक्यता असते.
अधिक व्यायामाने लवकर फिट होतो हा विचार योग्य नाही. कारण जास्त व्यायाम केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे नुकसान होऊ शकते. अधिक वर्कआउट केल्याने शरीर आराम करण्यास सक्षम नसते आणि हृदय सामान्य गतीपेक्षा वेगाने काम करत असते.
अधिक वाचा : या घरगुती उपयामुळे अंडरआर्म्सचा वास होईल दूर
व्यायाम केल्यामुळे भूक जास्त लागत असते. परंतु जास्त व्यायाम केल्यामुळे भूक कमी लागत असते. याचे कारण म्हणजे जास्त व्यायाम केल्याने शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे भूक कमी होते. ओटीएस म्हणजे ओव्हरट्रेनिंग सिंड्रोम ज्यामुळे भूक न लागणे, थकवा आणि वजन कमी होऊ शकते.
जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे संतुलन बिघडते तेव्हा झोपेच्या वेळी शरीराला तणाव जाणवतो. त्यामुळे नीट झोप लागत नाही. व्यायामानंतर शरीराला पुरेसा आराम हवा असतो. अपुरी झोप आणि थकवा यांसह काही वेळा अतिव्यायाम मूड स्विंग आणि चिडचिडेपणा होण्याची असते.
जास्त व्यायाम केल्यानंतर थकवा किंवा अशक्तपणा येत असतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीरात संसर्ग आणि रोगाचा धोका वाढतो.