Avoid These foods in Summer: उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अन्यथा, त्याचा तुमच्या आरोग्यावर प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. उष्णतेवर मात करण्यासाठी पाणी पिणे हा एक उत्तम मार्ग आहे, परंतु असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते. म्हणून, उन्हाळ्यात निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी, हे पदार्थ लवकरात लवकर आपल्या आहारातून काढून टाका.
मीठ सोडियम क्लोराईड म्हणूनही ओळखले जाते आणि ते अन्न चवीनुसार वापरले जाते. आहारातील अतिरिक्त मीठ शरीरात जळजळ, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासह विविध आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. विशेषत: जेव्हा जास्त प्रमाणात सोडियम शरीरात प्रवेश करते त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार होवू शकते. याचा अर्थ शरीर पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून, आपल्या आहारात मिठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक वाचा: दररोज रिकाम्यापोटी खा लसणाच्या दोन पाकळ्या, तुमच्यापासून दूर पळतील समस्या
जर तुम्हाला उन्हाळ्यात आपले शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवायचे असेल तर चहा किंवा कॉफीसारख्या गरम पेयांचे सेवन टाळा किंवा कमी करा. कारण ते संपूर्ण शरीराचे तापमान वाढवतात आणि पचनसंस्थेला त्रास देतात. त्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी, आंब्याचं पन, ताक इत्यादींचे सेवन करू शकता.
उन्हाळ्याच्या हंगामात मसालेदार अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. मसालेदार अन्नामध्ये मुख्यतः कॅप्सेसिन असते, जे पित्त दोषावर विपरित परिणाम करते ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, परिणामी जास्त घाम येणे, त्वचेवर उद्रेक होतात. शरीर डिहायड्रेट होते आणि अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तापमान वाढत असताना मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
तळलेले अन्न तुमच्या आरोग्यासाठी कधीही चांगले असू शकत नाही, मग ते तुमचा आवडता समोसा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, जंक फूड काहीही असो, हे सर्व खाद्यपदार्थ तुम्हाला डिहायड्रेट करू शकतात. तसेच, ते विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत पचण्यास कठीण असतात. या पदार्थांचा तुमच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
लोणचे हे सोडियमचे उच्च प्रमाण असलेले अन्न आहे, त्याचे नियमित किंवा जास्त सेवन केल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होवू शकते. लोणचे जास्त खाल्ले तर अपचनाचा त्रासही होऊ शकतो. सोडियम जास्त असलेले अन्न पोटात संक्रमण आणि अल्सरसारखे आजार तयार करू शकते.
अधिक वाचा: Health Tips: वेट लॉससाठी चिकन की पनीर? जाणून घ्या दोन्हीमधला फरक
सेलिब्रिटी फिटनेस तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ यश पटेल यांनी एचटी डिजिटलला सांगितले की, मिल्क चॉकलेट आणि व्हाइट चॉकलेट या दोन्हीपेक्षा डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. डार्क चॉकलेटचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयाची गती वाढणे, अतिसार, चिंता, चिडचिड, तणाव आणि डिहायड्रेशन होऊ शकते.