कोरोनापेक्षा धोकादायक बुरशीरुपी आजार

Extremely Dangerous Cadila Fungal Infection जगामोर नवे संकट आले आहे. हे संकट आहे कोरोनापेक्षा धोकादायक बुरशीरुपी आजाराचे.

Extremely Dangerous Cadila Fungal Infection
कोरोनापेक्षा धोकादायक बुरशीरुपी आजार 

थोडं पण कामाचं

  • कोरोनापेक्षा धोकादायक बुरशीरुपी आजार
  • नव्या आजारासमोर अँटी फंगल औषधे ठरली कुचकामी
  • नवा आजार हॉस्पिटलमध्ये पसरल्यास मोठा धोका

नवी दिल्ली: कोरोना संकटाने जगभर थैमान घातले आहे. पण कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगभर झालेल्या संशोधनामुळे हळू हळू या आजारातून वाचवण्याचे उपाय सापडत आहेत. संकटावर मात करणे शक्य असल्याची आशा निर्माण होत आहे. या असा आशादायी परिस्थितीत आता जगामोर नवे संकट आले आहे. हे संकट आहे कोरोनापेक्षा धोकादायक बुरशीरुपी आजाराचे. (Extremely Dangerous Cadila Fungal Infection)

नव्याने आढळलेल्या बुरशीरुपी आजारावर कशी मात करावी हे अद्याप लक्षात आलेले नाही. या नव्या आजारावर उपचार करण्यासाठी सध्या औषध किंवा लस उपलब्ध नाही. याच कारणामुळे संशोधक चिंतेत आहेत. जर हा आजार कोरोना प्रमाणे वेगाने पसरला तर जग नव्या संकटात सापडेल, अशी भीती संशोधक व्यक्त करत आहेत. 

नवा धोकादायक आजार कॅडिला ऑरिस फंगस ज्यांना आधी ब्लॅक प्लेग झाला आहे त्यांच्यात तीव्र स्वरुपात दिसतो. नंतर तो रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या शरीरात पसरू लागतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांना ब्लॅक प्लेग झाला आहे किंवा झाला होता त्यांना कॅडिला ऑरिस फंगस या नव्या बुरुशीरुपी आजाराने सर्वाधिक धोका आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकाच्या जीवालाही या आजारामुळे धोका आहे. 

कॅडिला ऑरिस फंगस या नव्या बुरुशीरुपी आजाराचा विषाणू वेगाने नवे अवतार घेत आहे. त्याच्या म्युटेशनचा वेग आणि म्युटेशनमुळे विकसित होत असलेल्या विषाणूच्या क्षमता यामुळे हा आजार जीवघेणा ठरण्याचा धोका वाढला आहे.

जगभर सध्या अस्तित्वात असलेली अँटी फंगल औषधे या कॅडिला ऑरिस फंगससमोर निकामी ठरत आहे. याच कारणामुळे हा आजार नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. कॅडिला ऑरिस फंगस हा नवा बुरशीरुपी आजार हॉस्पिटलमध्ये पसरला आणि मोठ्या संख्येने रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना झाला तर संकटाची तीव्रता वाढेल, असे संशोधक सांगत आहेत. 

वाढते प्रदूषण, निसर्गापेक्षा कृत्रिम वातावरणातले जगणे, जीभेला आवडणाऱ्या पण आरोग्याला हानीकारक असलेल्या पदार्थांचे वाढते सेवन यामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत आहे. या परिस्थितीत कॅडिला ऑरिस फंगस हा बुरशीरुपी आजार माणसांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता वाढली आहे.

सर्वात आधी २००९ मध्ये जपानमध्ये कॅडिला ऑरिस फंगस संशोधकांना आढळला होता. मूळ कॅडिला ऑरिस फंगस अँटी फंगल औषधांना दाद देत होता. सध्याचे त्याचे अवतार अस्तित्वात असलेल्या अनेक अँटी फंगल औषधांना दाद देत नाहीत. याच कारणामुळे कॅडिला ऑरिस फंगस हा बुरशीरुपी आजार एखाद्या मोठ्या गर्दीच्या हॉस्पिटलमध्ये पसरला तर तिथून नव्या संकटाची सुरुवात होण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत आहेत.

कॅडिला ऑरिस फंगस जमीनीवर दीर्घकाळ जीवंत राहू शकतो, असे लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या महामारी तज्ज्ञ जोहाना -होड्स यांनी सांगितले. ब्लॅक प्लेग व्यतिरिक्त हा फंगस माकडांमुळे माणसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे संशोधक चिंतेत आहेत. 

एकीकडे नव्या आजाराची चिंता असतानाच एका ताज्या वृत्ताने जगाची झोप उडवली आहे. ग्लोबल टाइम्स या चीन सरकारचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्राने एक धक्कादायक बातमी दिली आहे. चीनच्या पोलिसांनी केलेल्या तपासात देशात बनावट कोरोना प्रतिबंध लस विकल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात चिनी पोलिसांनी बनावट लसचा मोठा साठा जप्त केला. याच पद्धतीने चीनमधून वेगवेगळ्या मार्गाने बनावट लसचा साठा निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे वृत्त आल्यामुळे चीनमधील नागरिकांचा तसेच जगातील अनेक देशांचा चिनी लसवरील विश्वास उडाला आहे. चीनमधील रॅकेटमुळे सामान्यांचा बुद्धीभेद होण्याचा तसेच गैरसमज वाढल्यामुळे लसला नकार देण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. तसे झाल्यास कोरोनाला आळा घालणे आणखी कठीण होण्याचा धोका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी