Artificial Eggs:बाजारात मिळणारी बनावट अंडी बिघडवू शकतात तुमचं आरोग्य; कसं ओळखाल बनावट अंडी

बाजारात बनावट अंडी मिळत आहेत. खऱ्या अंड्यांसारखे दिसणारे अंडे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. बाजारातून अंडी (eggs)  खरेदी करताना बनावट आणि खरी अंडी ओळखणे आवश्यक आहे, अन्यथा ते आरोग्यासाठी (health) हानिकारक ठरू शकते.

Fake eggs can harm your health
बनावट अंडी बिघडवू शकतात तुमचं आरोग्य;  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • अंड्यांमध्ये Lutein आणि Zeaxanthin नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात.
 • अंडी खाल्ल्याने मोतीबिंदूसह डोळ्यांच्या इतर आजारांचा धोका कमी होतो.
 • नकली अंड्यांचा मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतो.

Real and Artificial Eggs: अंड्यांमध्ये भरपूर पोषक असतात, म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करतात. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. परंतु अंडी खाण् कदाचित घातक ठरू शकते, कारण बाजारात बनावट अंडी मिळत आहेत. खऱ्या अंड्यांसारखे दिसणारे अंडे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. बाजारातून अंडी (eggs)  खरेदी करताना बनावट आणि खरी अंडी ओळखणे आवश्यक आहे, अन्यथा ते आरोग्यासाठी (health) हानिकारक ठरू शकते.
(Fake eggs available in the market can spoil your health; How to identify fake eggs)

अधिक वाचा  : नोकरी गेली तरी नो टेन्शन! हा विमा घेईल आर्थिक गरजांची काळजी

अंडी खाण्याचे हे 9 फायदे 

उकडलेल्या व्हिटॅमिन A: RDA (Recommended Dietary Allowance) च्या 6%, फोलेट: RDA च्या 5%, व्हिटॅमिन B 5: RDA च्या 7%, व्हिटॅमिन B 12: RDA च्या 9%, व्हिटॅमिन B 2: RDA च्या 15%, फॉस्फरस: RDA च्या 9%, सेलेनिअम: RDA च्या 22% याच्या व्यतिरिक्त अंड्यामध्ये व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B 6, कॅल्शिअम आणि झिंक यांचा समावेश असतो.

अधिक वाचा  : कंटेंटच्या माध्यामातून Twitterवर कमवता येणार पैसा

अंड्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते हे खरे आहे. फक्त एका अंड्यामध्ये 212 ग्रॅम कॉलेस्ट्रॉल असते, जे दररोज शिफारस केलेल्या सरासरी सेवनाच्या (300mg) निम्म्याहून अधिक असते. आहारात जास्त कॉलेस्ट्रॉल असेल याचा अर्थ रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही जास्त असेल असे अजिबात नाही. यामागील कारण म्हणजे आपले यकृत दररोज भरपूर कॉलेस्ट्रॉल तयार करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आहारात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त घेतले तर यकृत त्याच्या वतीने कॉलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी करते. हाय डेनसिटी लिपोप्रोटिन म्हणजेच एचडीएल कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासही अंडी मदत करतात. 

वाढत्या वयासोबत अनेकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ लागतात. अंड्यांमध्ये Lutein आणि Zeaxanthin नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. काही अभ्यासांमध्ये असे समोर आले आहे की, या पोषक घटकांचा आहारात पुरेशा प्रमाणात समावेश केल्यास मोतीबिंदूसह डोळ्यांच्या इतर आजारांचा धोका कमी होतो. परंतु जर तुम्ही जर नकली अंडी तुमच्या आहारात घेत असाल तर तुमच्या आरोग्याला धोका असतो. 

अधिक वाचा  : भारतातील 'या' शहरात पहिल्यांदा दिसणार चंद्रग्रहण

बनावट अंड्याचे नुकसान

 • नकली अंड्यांचा मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतो. रसायनांपासून बनवलेली ही अंडी यकृतासाठीही हानिकारक असतात.
 • बनावट अंडी हाडे कमकुवत करू शकतात. अशी अंडी खाल्ल्याने किडनीवरही वाईट परिणाम होतो.
 • बनावट अंडी रक्त बनवण्याच्या क्षमतेवरही परिणाम करतात. बनावट अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात अॅनिमिया होऊ शकतो. याचा परिणाम रक्तदाबावरही होतो.

बनावट अंडी कशी असतात

 • नकली अंडी हुबेहुब खऱ्या अंड्यांसारखी दिसतात. ही बनावट अंडी चीनमधून येऊन देशात येत आहेत.  
 • बनावट अंडी सिंथेटिक आणि प्लास्टिकपासून बनवली जातात. बनावट अंड्यांपासून दूर राहण्यासाठी त्यांची ओळख पटवणे आवश्यक आहे.

नकली-वास्तविक कसे ओळखावे 

 • बाजारातून सरळ अंडी बनवण्याऐवजी त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रथम अंडी फोडण्याचा प्रयत्न करा. अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग नीट मिसळला तर अंडी बनावट आहे.
 •  नकली अंड्याचा पांढरा भाग खऱ्या अंड्यापेक्षा जास्त कडक असतो, जर अंडी दाबल्यावर सहज फुटत नसेल तर हे अंडे नकली समजावे.
 • नकली अंडे आगीजवळ आणल्यास त्याला आग लागते आणि खूप आग लागल्यास ते जळू शकतात.
 • सिंथेटिक आणि प्लास्टिकपासून बनवलेले अंडे पाण्यात बुडणार नाही, तर खरे अंडे पाण्यात बुडत असतात.
 • मुंग्या आणि माश्यासारखे प्राणी बनावट अंड्यांवर बसत नाहीत, तर माश्या लवकरच खऱ्या अंड्यांवर बसू लागतात. अंडी उघड्यावर ठेवल्यावर माश्या बसल्या नाहीत तर ही अंडी बनावट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी