वाचा 'या' टिप्स लवकर कमी होईल वाढलेलं पोट अन् वजन ; आता कडक डायटला ठोका रामराम

वजन कमी करायचं म्हटलं तर आपल्या डोक्यात डायट हा शब्द घोंघावत असतो. त्यानंतर दुसरा शब्द येतो तो म्हणजे व्यायाम.

fast weight loss tips; lose weight with these tips
लवकर कमी होईल वाढलेलं पोट अन् वजन   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

 • झोपण्याआधी दूध प्यायल्याने वजन होईल कमी
 • सकाळी एक ग्लास पाणी पिणे आहे फायद्याचे
 • चालण्याने होईल वजन कमी

नवी दिल्ली : वजन कमी करायचं म्हटलं तर आपल्या डोक्यात डायट(Diet) हा शब्द येत असतो. त्यानंतर दुसरा शब्द येतो तो म्हणजे व्यायाम(Exercise). पण तुम्हाला माहिती आहे का आपण अचानकपणे डायट सुरू केला तर आपल्या शरिरावर वाईच परिणाम होऊ शकतात. दरम्यान आजच्या लेखात आम्ही काही कानमंत्र देणार आहोत त्यातून तुमचं वाढलेले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.(fast weight loss tips; lose weight with these tips )

 1. जर तुम्ही आपले वजन कमी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दुसरं काही न करत दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करा. त्यानंतर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म वाढेल. यासह पुर्ण दिवसभर भरपूर पाणी प्या. 
 2. वजन कमी करण्यासाठी सकाळी भोपाळ्याचा ज्यूस, कोरपड, गिलोय आणि व्हीटग्रास ज्यूस पिवू शकतात. 
 3. सकाळी नाष्टामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात अधिक तत्व असतील. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. 
 4. जेवणाच्या अर्धा तास आधी पोटभर पाणी प्या. यामुळे अधिक जेवन करण्याचा मन होणार नाही. यासह जेवण केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास किंवा एक तासानंतर पाणी प्यावे.
 5. जास्त तेलगट पदार्थ बर्गर, पिझ्झा, पनीर, कॅलरी अधिक असलेले ड्रिंक्सचं सेवन करू नका. 
 6. साखर युक्त पदार्थांचे सेवन कमीत कमी करा, कारण यामुळे वजन अधिक वाढते. 
 7. फळे आणि हिरव्या पालेभाज्या अधिक खा. 
 8. जेवणाच्या आपल्या थाळीत अधिक भाज्या, सलाड ठेवा, यामुळे तुमचे शरिर निरोगी राहील. यासह वजनावर नियंत्रण असेल. 
 9. झोपण्याच्या आधी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास फॅट फ्री दूध प्या. 
 10. बसून खाण्याची सवय लावा. यामुळे अन्नाचे पचन लवकर होईल. 
 11. जर जेवणात जास्त पदार्थ घेण्याची सवय असेल तर हाताने जेवण्याऐवजी चमच्याने खाण्याची सवय करा. यामुळे कमी खाण्याची सवय होईल. 
 12. दुधाच्या चहाऐवजी अद्रकची चहा किंवा ग्रीन टी घ्या. ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते. 
 13. कडधान्यांचा अधिक करा. यात अधिक फायबर असतं. यामुळे लवकर भूख लागत नाही.
 14. वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे जास्ती जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ४ किंवा ५ व्या मजल्यावर राहत असाल तर लिफ्टचा उपयोग न करता पायऱ्याने चढ-उतर करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी