fat loss exercise ladies can reduce their weight with these 6 effective exercises in any age do it daily to get a fit and slim body : वेटलॉस (wightloss) अर्थात वजन कमी करणे. वजन तर हल्ली अनेकांना कमी करायचे असते. पण वजन कमी करणे सर्वांसाठी कधीही एकसारखे असू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या सूत्रानुसार प्रत्येकाने आपल्या तब्येतीला झेपेल अशाच पद्धतीने वजन कमी करणे हिताचे असते, असे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते अनेक तपासण्यांच्याअंती व्यायामाचे सहा प्रभावी प्रकार (Effective Ways To Lose Weight) लक्षात आले आहेत. या सहा व्यायाम प्रकारांनी (Weight Loss Exercise) महिला त्यांचे वजन झटपट कमी करू शकतात. पण या पैकी कोणत्याही व्यायाम प्रकाराची निवड करण्याआधी खबरदारीचा उपाय म्हणून तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे आहे.
आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी
आपण जेवढे जास्त खाल तेवढ्या जास्त कॅलरी शरीरात निर्माण होतील. आपण जेवढे जास्त शारीरिक श्रम कराल तेवढ्या जास्त कॅलरी बर्न होतील. शरीरात निर्माण होणाऱ्या कॅलरींच्या तुलनेत बर्न होणाऱ्या कॅलरींचे प्रमाण कमी झाल्यावर वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. वाढलेले वजन रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांच्यासह अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आरोग्यासाठी लाभदायी आहे.