Fatty Liver: फॅटी लिव्हर फक्त दारू प्यायल्याने होत नाही...या 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Health Tips : सर्वसाधारणपणे लिव्हर म्हणजे यकृताची समस्या म्हटली की त्याचा संबंध मद्यपानाशी (Alcoholic) जोडला जातो. मात्र फक्त मद्यपान करणाऱ्यांना यकृताचा आजार होतो असे अजिबात नाही. तुमची जीवनशैली, आहार-विहार याचाही यकृतावर मोठा परिणाम होत असतो. नॉन-अल्कोहोलिक लिव्हर डिसीज (NAFLD)हा देखील एक आजार आहे.

Fatty Liver
फॅटी लिव्हर 
थोडं पण कामाचं
  • फक्त मद्यपानामुळेच लिव्हर खराब होत नाही
  • फॅटी लिव्हरची समस्या हल्ली सर्वत्र आढळते
  • काय असतात लक्षणे

Fatty Liver Symptoms: नवी दिल्ली : अलीकडच्या काळात काही आजारांचे प्रमाण वाढले आहे त्यातील एक म्हणजे फॅटी लिव्हरची (Fatty Liver) समस्या. अनेकांना हा त्रास होत असतो. सर्वसाधारणपणे लिव्हर म्हणजे यकृताची समस्या म्हटली की त्याचा संबंध मद्यपानाशी (Alcoholic) जोडला जातो. मात्र फक्त मद्यपान करणाऱ्यांना यकृताचा आजार होतो असे अजिबात नाही. तुमची जीवनशैली, आहार-विहार याचाही यकृतावर मोठा परिणाम होत असतो. नॉन-अल्कोहोलिक लिव्हर डिसीज (NAFLD)हा देखील एक आजार आहे. हा आजार कमी किंवा अजिबात मद्यपान न करणाऱ्या लोकांना होऊ शकतो. जेव्हा आपल्या लिव्हरमध्ये जास्त चरबीजमा होते तेव्हा हा आजार होतो. (Fatty liver does happen only because of liquor, check these 6 symptoms)

अधिक वाचा  : भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती

फॅटी लिव्हरवर योग्य वेळी आणि योग्य मार्गाने उपचार केले गेले नाहीत, तर त्यातून गुंतागुंत निर्माण होत सिरोसिस किंवा यकृत निकामी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही मद्यपान करत असोत की नाही फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे.

लिव्हरसंदर्भात दुर्लक्ष करू नये अशी लक्षणे-

भूक न लागणे
अनेकदा भूक लागत नाही, आहार कमी, खाण्याची इच्छा होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. मात्र हे बऱ्याच कालावधीपासून होत नसेल आणि अचानक मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या झाल्यासारखे वाटत असेल तर ती स्थिती गंभीर असू शकते. भूक न लागणे हे फॅटी लिव्हरचे सर्वसामान्य लक्षण आहे. भूक न लागण्याची बाब बऱ्याच कालावधीपासून होत असेल तर नक्कीच यकृताची तपासणी करा.

अधिक वाचा  : आता मेटामधील अनेकांना आठवड्याभरात मिळणार नारळ

अशक्तपणा येणे
सतत अशक्यपणा जाणवणे, सतत कमकुवत वाटणे हे यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. एका संशोधनानुसार, मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरमधील बदलांमुळे असे होऊ शकते. म्हणजेच तुम्ही अल्कोहोल प्यायला असो वा नसो, जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, तर तुमच्या यकृताची तपासणी करून घेणे योग्य आहे.

त्वचा सुकणे
लिव्हरच्या समस्येचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. तुमच्या त्वचेवरूनही यकृताचे आरोग्य कळू शकते.  संशोधनात असे दिसून आले आहे की यकृत रोगामुळे पित्त क्षारांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे त्वचा कोरडी होत आणि खाज सुटते. 

अधिक वाचा  : कंटेंटच्या माध्यामातून Twitterवर कमवता येणार पैसा

डोळे आणि त्वचा पिवळसर होणे
यकृताची समस्या उद्भवल्यास त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम होतो. कारण शरीरात बिलीरुबिनची पातळी वाढते आणि त्यामुळे पिवळसरपणा येतो. याला कावीळ झाली असे म्हणतात. हा अतिशय गंभीर आजार आहे. 

अचानक वजन कमी होणे
लिव्हरची समस्या उद्भवल्यास वजन कमी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे तुमचे वजन जर अचानक कमी होऊ लागले तर त्यातून काहीतरी गंभीर आजार सूचित होतो. तुमचे लिव्हर निरोगी नसल्याचे हे लक्षण असते.  हे केवळ लिव्हर सिरोसिसच नाही तर हेपेटायटीस-सी सारख्या विषाणूजन्य संसर्गाचेही लक्षण असू शकते. या आजारात लिव्हरला सूज येते आणि वेदनाही होतात.

लगेच जखम होणे
लिव्हरमध्ये समस्या निर्माण झाल्यास तुमच्या त्वचेला लगेच फोट येतात, जखमा होतात. कारणे लिव्हर खराब झाल्यास ते पुरेशी क्लोटिंग प्रथिने तयार करू शकत नाही. परिणामी  नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्वचेवर फोड येऊ शकतात. अर्थात शरीरावर जखमा होण्यामागे इतरही कारणे असू शकतात.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी