Fenugreek Benefits:मेथीचे अनेक आरोग्यदायी फायदे, फक्त दाण्यांचा असा करा वापर

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Nov 02, 2022 | 10:06 IST

Fenugreek Benefits: मेथीचे दाणे दिसायला लहान असले तरी प्रत्यक्षात त्यांचा खूप उपयोग होतो. मेथी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला जाणून घेऊया ते खाण्याचे फायदे.

Fenugreek Benefits
इतक्या आजारांसाठी गुणकारी आहे मेथी, जाणून घ्या त्याचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • मेथीमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे औषधी बनवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.
  • प्राचीन काळापासून अनेक घरगुती उपचारांमध्ये (home remedies ) मेथीचा वापर केला जात आहे.
  • मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, (fiber, vitamin C) व्हिटॅमिन सी, आयरन यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

मुंबई: Diabetes: मेथीचा (Fenugreek) उपयोग भाजी (vegetables), डाळ इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. मेथीचे दाणेच नव्हे तर त्याची पानेही भाजी बनवण्यासाठी वापरली जातात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे औषधी बनवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. प्राचीन काळापासून अनेक घरगुती उपचारांमध्ये (home remedies )  मेथीचा वापर केला जात आहे. मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, (fiber, vitamin C)  व्हिटॅमिन सी, आयरन यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. चला जाणून घेऊया मेथी खाण्याचे  (health benefits of eating fenugreek) आरोग्यदायी फायदे काय आहेत. 

केसांच्या आरोग्यासाठी चांगले

केस निरोगी ठेवण्यासाठी मेथी उत्तम आहे. जे लोक मेथीचे पाणी केसांना लावतात त्यांचे केस गळणे लवकर थांबते. केसांना लावण्यासाठी काही मेथी दाणे पाण्यात उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड करून डोके धुवा आणि किमान 10 मिनिटे तसेच राहू द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथीच्या दाण्यांची पेस्ट तयार करून ओल्या केसांना लावू शकता.

अधिक वाचा-  ट्विटरच्या ब्लू टिकसाठी मस्क यांची मोठी घोषणा, आता मोजा इतके पैसे

शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर

मेथीमुळे डायबिटीज नियंत्रित राहण्यास मदत होते. मेथीमध्ये गॅलेक्टोमनन नावाचा विरघळणारा फायबर असतो जो रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी याचे सेवन करावे.

वजन कमी करण्यास मदत होते

मेथीचे दाणे वजन कमी करण्यासही मदत करतात. वजन कमी करण्यासाठी मेथी दाणे भाजून त्याची पावडर बनवा. हे चूर्ण रोज सकाळी कोमट पाण्यासोबत खावे. याशिवाय रिकाम्या पोटी भिजवलेली मेथी खाल्ल्यानेही वजन कमी होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी मेथी वरदान आहे. जर तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर तुम्ही मेथीचे अधिक सेवन करावे. तुमच्या जेवणात अधिकाधिक मेथी घाला. याशिवाय तुमच्या आहारात मेथीचा समावेश करा. मेथीचे पाणी प्यायल्यानेही कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया याचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी