Diabetes: मेथी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते, बद्धकोष्ठता आणि पाठदुखी कमी करते

Diabetes: रोग प्रतिकारशक्ती, बदलती जीवनशैली यामुळे दैनंदिन आयुष्य सुधारण्यासाठी, लोकं मेथी किंवा इतर पर्यायी भाजांकडे वळू लागले आहेत

Fenugreek helps in lowering blood sugar, lowers prestige and back
आरोग्यदायी मेथी, अनेक आजारांवर रामाबाण औषध  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेथीच्या दाण्यामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म
  • फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध आहे मेथी
  • रोजच्या आहारात मेथी दाणा समाविष्ट करा


Diabetes: आरोग्यदायी, हेल्दी पदार्थांकडे नागरिकांचा कौल वाढू लागल्याने, भाजीपाला उत्पादक आणि खाद्य उद्योगांवर लोकांना अधिकाधिक प्रोत्साहित करणारी उत्पादने विकसित करण्याची जबाबदारी वाढलीय. रोग प्रतिकारशक्ती, बदलती जीवनशैली यामुळे दैनंदिन आयुष्य सुधारण्यासाठी, 
लोकं मेथी किंवा इतर पर्यायी भाजांकडे वळू लागले आहेत


अगदी खरे सांगायचे तर आपल्यापैकी अनेकांना लहानपणी मेथीची भाजी किंवा मेथी आवडत नव्हती. आलू टिक्की जेवढी आपल्याला आकर्षित करते, तेवढी हिरव्या पानांची भाजी करत नाही. तरीदेखील घरोघरी आई आपल्या मुलांना मेथीचे पराठे किंवा थेपले बनवून देतात. ओटीपोटात दुखणे किंवा पाठदुखी, मासिक पाळीच्या वेळी किंवा बाळंतपणानंतर, सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरातील महिलांना एक चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. केवळ गृहिणीच नव्हे तर Diabetes.co.uk नेसुद्धा मेथीच्या मधुमेहाविरोधी गुणधर्मांवर शिक्कामोर्बत केलं आहे.


गेल्या काही वर्षांत मेथीच्या बियांच्या औषधी आणि कार्यात्मक गुणधर्मांवर अभ्यास करण्यात आला आहे. सौदी अरेबियातील सौद विद्यापीठाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मेथीचे दाण्यांमध्ये औषधी तत्व आहेत. या अभ्यासात मेथी मधुमेहविरोधी, प्रजननविरोधी, कर्करोगविरोधी, प्रतिजैविक, अँटीपॅरासायटिक, स्तनपान उत्तेजक आणि हायपोकोलेस्टेरोलेमिक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

मेथी फायबर, प्रथिने समृध्द आहे. तसंच बायोएक्टिव्ह घटकांमुळे आश्वासक उपचाराची शाश्वती असस्याने तीचं मूल्य वाढतं. विविध अभ्यासांतून हे सिद्ध झालं की अँटीडायबेटिक, अँटीऑक्सिडंट, अँटीकार्सिनोजेनिक, हायपोग्लायसेमिक ऍक्टिव्हिटी, हायपोकोलेस्टेरोलेमिक ऍक्टिव्हिटी हे मेथीचे प्रमुख औषधी गुणधर्म आहेत. आरोग्यदायी फायद्यांसाठी गुणकारी म्हणून मेथीची शिफारस करण्यात येते. याशिवाय मेथीचा रोजच्या आहारात सहभाग वाढवला, तर त्याचा फायदा होऊ शकतो. 

मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलवर फायदेशीर मेथी

This is what happens when you eat Fenugreek daily | The Times of Indiaमेथीच्या संभाव्य मधुमेहविरोधी फायद्यांची तपासणी करण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले आहेत. मेथीच्या समावेशामुळे टाइप 1 आणि टाइप 2 या दोन्ही मधुमेहाशी संबंधित चयापचय क्रियेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. शिवाय रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत सकारात्मक घट दिसून आली, तसंच रुग्णाची ग्लुकोज पातळी सुधारली.

एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की इन्सुलिनवर विसंबून (टाइप 1) मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रोजच्या आहारात 100 ग्रॅम मेथीच्या बियांची पावडर टाकली. तर, एकूण कोलेस्ट्रॉल, LDL किंवा 'खराब' कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होते.

दीर्घ काळापासून गर्भधारणा ते बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा मेथीचा वापर केला जातो. अँटीव्हायरल गुणधर्म असणारी मेथी सर्दी आणि घसा खवखवण्यावरही फायदेशीर ठरते. संधिवात, केस गळणे, बद्धकोष्ठता, पोट खराब होणे, किडनीचे आजार, छातीत जळजळ, पुरुष नपुंसकत्व आणि इतर प्रकारच्या लैंगिक आजारांवर उपचारांसाठीसुद्धा मेथी प्रभावी आढळते.

हिरवी भाजी, संपूर्ण बिया किंवा चूर्ण म्हणून मेथी खा. किंवा दुसरा पर्याय शोधा

मोड आलेले मेथीचे दाणे वाळलेल्या बियाण्यांपेक्षा जास्त फायदेशीर ठरतात.

डिस्क्लेमर: कृपया मेथी अधिक प्रमाणात प्रमाणात घेऊ नका. त्यामुळे अपाय होऊ शकतो. मेथीचा आहारात समावेश करण्याआधी मधुमेहाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी