Fenugreek for Blood Sugar: मेथीचे बी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी; या ३ प्रकारे करा सेवन 

तब्येत पाणी
Updated May 31, 2022 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Fenugreek for Blood Sugar । मेथीच्या बियाला आयुर्वेदामध्ये औषध मानले जाते. वजन कमी करण्यापासून ते डायबिटीज आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापर्यंत सर्वच बाबतीत मेथीचे बी खूप फायदेशीर आहेत.

Fenugreek seeds are effective in controlling blood sugar
मेथीचे बी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेथीच्या बियांना आयुर्वेदामध्ये औषध मानले जाते.
  • वजन कमी करण्यापासून ते डायबिटीज आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापर्यंत सर्वच बाबतीत मेथीचे बी खूप फायदेशीर आहेत.
  • साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे.

Fenugreek for Blood Sugar । मुंबई : मेथीच्या बियांना आयुर्वेदामध्ये औषध मानले जाते. वजन कमी करण्यापासून ते डायबिटीज आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापर्यंत सर्वच बाबतीत मेथीचे बी खूप फायदेशीर आहेत. खर तर मेथीमध्ये जिंक, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी, सोडियम, फॉस्फरस, आयरन, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. शरीर निरोगी बनवण्यासोबतच शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीच्या बियांचे सेवन करण्याच्या बाबतीत. (Fenugreek seeds are effective in controlling blood sugar). 

अधिक वाचा : लग्नात फोटोग्राफर नाही आला म्हणून नवरीने दिला लग्नास नकार

 मेथीचे बी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी

  1. अंकुरलेली मेथी - डायबिटीजमध्ये साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अंकुरलेल्या मेथीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. मेथीचे अंकुरलेले बी बनवण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचे दाणे पाण्यातून काढून सुती कपड्यात बांधून ठेवा. त्यानंतर मेथीचे दाणे एक दिवसानंतर अंकुरलेली असतील. आता तुम्ही काळे मीठ किंवा साधे मीठ टाकून खाऊ शकता.
  2. मेथीचे पाणी - साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे. मेथीचे पाणी तयार करण्यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या त्यामुळे फायदा होईल. 
  3. मेथीपासून हिरव्या भाज्या बनवा - रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि डायबिटीजच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मेथीच्या हिरव्या भाज्यांचे सेवन केले जाऊ शकते. खर तर मेथीमध्ये हायड्रॉक्सीसिल्युसिन नावाचे अमिनो ॲसिड असते, जे साखर कमी करण्याचे काम करते. यासोबतच हे रक्तातील इन्सुलिन वाढवण्यातही प्रभावी आहे, जे डायबिटीजला नियंत्रित ठेवते. मेथीचे सेवन करण्यासाठी मेथीपासून हिरव्या भाज्या बनवता येतात. यासोबतच भाजी आणि पराठेही करता येतात.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी