snakebite : सर्पदंश झाल्यास काय करावे?

first aid tips What to do in case of snakebite? : सर्पदंश झाला अर्थात साप चावला तर लगेच त्या सापाला मारू नये. भारतात नाग (कोब्रा), फुरसे, मण्यार, घोणस हे चार प्रमुख विषारी साप आढळतात. इतर साप बिनविषारी किंवा अतिशय कमी विष असलेले अशा स्वरुपाचे आहेत.

first aid tips What to do in case of snakebite?
snakebite : सर्पदंश झाल्यास काय करावे?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • snakebite : सर्पदंश झाल्यास काय करावे?
  • सर्पदंश झाला अर्थात साप चावला तर लगेच त्या सापाला मारू नये
  • लक्षात ठेवा बिनविषारी साप चावला तर माणसाच्या जीवाला कोणताही धोका नसतो

first aid tips What to do in case of snakebite? : साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असे सांगतात. शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या उंदीर, घूस अशा उपद्रवी प्राण्यांची शिकार करणारा साप अप्रत्यक्षपणे शेतकऱ्याच्या हितांचे रक्षण करत असतो. साप माणसावर कधीही हल्ला करत नाही. पण नकळत माणसामुळे सापाला त्रास झाला, सापाला आपण संकटात आहोत असे वाटले तर तो स्वसंरक्षणासाठी दंश करतो. एरवी साप माणसापासून लांब राहणे पसंत करतो. साप हा माणसाच्या हिताचे काम करतो पण त्याच्याविषयी मानवी मनात असलेल्या गैरसमजुती, भीती यामुळे काही वेळा बिकट परिस्थिती निर्माण होते. 

सर्पदंश झाला अर्थात साप चावला तर लगेच त्या सापाला मारू नये. भारतात नाग (कोब्रा), फुरसे, मण्यार, घोणस हे चार प्रमुख विषारी साप आढळतात. इतर साप बिनविषारी किंवा अतिशय कमी विष असलेले अशा स्वरुपाचे आहेत. यामुळे सर्पदंशानंतर वेळेत वैद्यकीय उपचार घेतले तर संबंधित व्यक्तीचा जीव वाचू शकतो. 

लक्षात ठेवा बिनविषारी साप चावला तर माणसाच्या जीवाला कोणताही धोका नसतो. पण गैरसमज किंवा भीतीपोटी अनेकजण साप चावला म्हणजे शरीरात विष गेले असे समजतात. भारतात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूपैकी ७५ टक्के मृत्यू हे भीतीपोटी होतात. यामुळे साप चावला तर घाबरू नका. 

सर्पदंश झाला तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्य असल्यास ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे त्या व्यक्तीला इतरांनी उचलून डॉक्टरांकडे आणावे पण वैद्यकीय उपचार होईपर्यंत संबंधित व्यक्तीला जास्त हालचाल करू देऊ नये. यामुळे साप विषारी असला तरी विष संपूर्ण शरीरात वेगाने पसरत नाही. 

अनुभवी डॉक्टर सर्पदंशाची खूण बघून चावलेला साप विषारी होता की नाही याचा अंदाज बांधू शकतात. सर्पदंशाच्या रुग्णांना हाताळण्याचा अनुभव असलेले डॉक्टर फक्त सर्पदंशाच्या खुणांवरून कोणता साप चावला याचाही अंदाज सांगू शकतात. 

साप चावल्यास कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला उपचार करेपर्यंत झोपू न देणे आवश्यक आहे. जर साप विषारी असेल तर सर्पदंशानंतर बेशुद्ध झालेल्या किंवा चक्कर येत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात वेगाने विष पसरू शकते. यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Optical Illusion : झाडात लपलेला साप दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले नापास, तुम्ही करा प्रयत्न

Optical Illusion:  शोधून दाखवा : कासवांच्या गर्दीत लपला आहे साप, बघुया तुमची नजर किती चांगली आहे

साप चावला तर...

  1. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झोपू न देणे
  2. तातडीने डॉक्टरांकडे न्यावे, वैद्यकीय उपचार करावेत.
  3. सर्पदंशानंतर उपचार केले तरी डॉक्टरांनी रुग्णाला किमान २४ ते ४८ तास देखरेखीत ठेवावे.
  4. पुरेश्या सुविधा नसल्यास प्रथमोपचार करून रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावे.
  5. रुग्णाला हालचाल करू न देणे आणि त्याच्या मनातील भीती दूर करणे
  6. सर्पदंशाची जागा ही हृदयाच्या उंचीहून खाली ठेवणे तसेच दंशामुळे निर्माण झालेल्या जखमेवर डॉक्टरांकडून उपचार करून घेणे आवश्यक
  7. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला भीती वाटणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक. तसेच त्या व्यक्तीच्या शरीरात वेगाने रक्ताभिसरण होणार नाही याचीही खबरदारी घेणे आवश्यक.

खबरदारी : सापापासून धोका असल्यास संबंधित परिसरात दाट झाडीच्या भागातून प्रवास टाळावा. प्रवास करणे आवश्यक असल्यास सोबत एक प्रखर प्रकाशाचा टॉर्च (बॅटरी) आणि एखादी काठी बाळगावी.

लक्षात ठेवा विषारी साप चावला तर शरीरातील अवयवांचे कार्य थंडावू लागते. जर तसे होत असेल तर संबंधित व्यक्तीला तातडीने डॉक्टरांकडे नेणे हिताचे.

विषारी सापांचे विष फिकट पिवळसर, अर्ध पारदर्शक व काही प्रमाणात चिकट असते. 

सर्पदंश करून मज्जासंस्थेवर परिणाम करणारे साप : नाग आणि मण्यार

सर्पदंश करून रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे साप : फुरसे आणि घोणस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी