One diet a day: रोज फक्त एकदाच जेवण, चाळीशीतील श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य

काही महिन्यांपूर्वी श्वेता तिवारीचं वजन चांगलंच वाढलं होतं. त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि पोटावरही काम केलं. तिच्या पर्सनल ट्रेनरने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तिने जेवण्याचा पॅटर्न बदलला आहे. त्याचा तिला प्रचंड फायदा झाला असून ती पूर्वीपेक्षाही सुंदर दिसू लागली आहे.

One diet a day
चाळीशीतील श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य
  • दिवसातून एकदाच घेते पूर्ण जेवण
  • आठवड्यातून तीन वेळा जिममध्ये वेट ट्रेनिंग

One diet a day: टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) वयाच्या 42 व्या वर्षीही फिट आहे. तिच्याकडे पाहून ती तिशीतील असल्याचं अनेकांना वाटतं. योग्य आहार, चांगली लाईफस्टाईल आणि पुरेशी झोप या आधारे तिेने आपला फिटनेस (Fitness) टिकवून ठेवला आहे. वास्तविक, काही महिन्यांपूर्वी श्वेता तिवारीचं वजन चांगलंच वाढलं होतं. त्यानंतर तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि पोटावरही काम केलं. तिच्या पर्सनल ट्रेनरने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तिने जेवण्याचा पॅटर्न बदलला आहे. त्याचा तिला प्रचंड फायदा झाला असून ती पूर्वीपेक्षाही सुंदर दिसू लागली आहे. जाणून घेऊया, तिच्या फिटनेसचं रहस्य.

दिवसातून एकदाच जेवण

स्वतःला फिट ठेवण्यासाठी श्वेता तिवारी दिवसातून एकदाच सॉलिड मील (जेवण) करते. त्यात 100 ग्रॅम चिकन किंवा मासे, 200-300 ग्रॅम भाज्या आणि ज्वारीची एक भाकरी खाते. जर सॅलड नसेल तर त्याऐवजी पालकाची किंवा मेथीची भाजी खाणं ती पसंत करते. सकाळच्या नाश्त्याला ती 90 ग्रॅम ग्रीक योगर्ट आणि 8 ते 10 बदाम खाते. संध्याकाळी ती एक संत्रं आणि एक कप डिटॉक्स टी असा आहार घेते. यात मोठ्या प्रमाणावर अँटि ऑक्सिडंट्स असतात. 

अधिक वाचा - Food to avoid in dinner: रात्रीच्या जेवणात ‘या’ पाच गोष्टी विषासमान, वाचा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला

कॅलरीचा हिशोब

प्रत्येक व्यक्तीला वजन संतुलित ठेवण्यासाठी दिवसातून साधारण 2 हजार कॅलरीची गरज असते. दैनंदिन कामे करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी तेवढ्या कॅलरींची शरीराला गरज असते. मात्र श्वेताच्या कोचने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ती दिवसाला केवळ 1 हजार कॅलरी घेते. मुलगा लहान असल्यामुळे त्याच्या आग्रहाखातर तिला कधीकधी एखाद-दुसरा घास जास्त खावा लागतो. तिची उंची 5 फूट 8 इंच असून त्यानुसार तिचं वजन अगदी योग्य आहे. तिचं कुठलंही फिटनेसचं टार्गेट नसलं तरी स्वतःला मेंटेन करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. 

अधिक वाचा - Stamina Tips for Men: हा घरगुती उपाय वाढवतो 'स्टॅमिना' , पुरुषांसाठी 'रामबाण' मानला जातो

व्यायामाचे वेळापत्रक

श्वेता तिवारी सध्या बिझी असल्यामुळे रोज जिमला जाऊन व्यायाम करू शकत नाही. मात्र सध्या ती आठवड्यातून तीन दिवस व्यायाम करते. जिममध्ये जाऊन मुख्यतः वेट ट्रेनिंग करण्यावर तिचा भर असतो. त्याशिवाय इतर तीन दिवस फंक्शनल ट्रेनिंगचा व्यायाम ती करते, ज्यात बॉडी वेट वर्कआऊटचा समावेश असतो. हाय इंटेंसिटी इंटर्वल ट्रेनिंग आणि योगा यांचाही समावेश तिच्या व्यायामात असतो. चेस्ट ट्रायसेप्स, बॅक बायसेप्स, लेग्ज आणि शोल्डर मसल्स यांचा एकत्रित व्यायाम ती करते. सध्या शूटिंग आणि प्रवासामुळे तिच्या व्यायामाचे वेळापत्रक वेगळे आहे. थकवा जाणवू नये, यासाठी हलका व्यायाम करण्याचा सल्ला तिला देण्यात येतो. शूटिंग संपल्यानंतर व्यायामाचं प्रमाण वाढवण्यात येत असल्याचंही तिचे कोच सांगतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी