Fitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून 8 किलोमीटर चालणं आहे फायदेशीर

लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. यामुळे जर तुम्हाला स्वतःला फीट अँड फाईन ठेवायचं असेल तर तुम्हाला रोज चालावं लागतं. मात्र उत्तम आरोग्यासाठी दररोज किती किलोमीटर चालावं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

Fitness Tips :  It is beneficial to walk 8 kilometers a day to stay fit
दिवसातून 8 किलोमीटर चालणं आहे फायदेशीर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चालणं हा एक प्रकारचा व्यायाम आहे, जो तुम्हाला शारीरिकदृष्टा तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो.
  • दररोज चालण्याने स्नायू मजबूत होतात, रक्त प्रवाह सुधारतो

मुंबई : लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. यामुळे जर तुम्हाला स्वतःला फीट अँड फाईन ठेवायचं असेल तर तुम्हाला रोज चालावं लागतं. मात्र उत्तम आरोग्यासाठी दररोज किती किलोमीटर चालावं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. दररोज चालण्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. तर आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी दिवसात किती किलोमीटर चालणं आवश्यक आहे.

मेडिकल न्यूज टुडेच्या एका अहवालानुसार, फिट राहण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दररोज सुमारे 10000 पावलं चालणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हे अंतर सुमारे 8 किलोमीटर आहे. परंतु तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे अंतर आणखी वाढवू शकता.चालणं हा एक प्रकारचा व्यायाम आहे, जो तुम्हाला शारीरिकदृष्टा तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. इतकंच नाही तर अनेक लोकांसाठी हे वजन कमी करण्यातही प्रभावी ठरते. जरी चालण्याचे अनेक प्रकार आहेत, परंतु आपण सामान्य चालणं आपल्या दैनंदिन दिनचर्याचा एक भाग बनवू शकता.

पायी चालण्याचे फायदे

आर्थरायटिस फाऊंडेशनने चालण्याच्या फायद्यांसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, दररोज चालण्याने स्नायू मजबूत होतात, रक्त प्रवाह सुधारतो त्याचप्रमाणे लवचिकता वाढते. चालण्याने वृद्धांमध्ये सांधे जडपणा, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी