धूम्रपानामुळे झालेला त्रास कमी करणारे पाच आयुर्वेदिक उपाय

Five Ayurvedic Remedies to Reduce Smoking Side Effects : ज्यांना धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे तसेच धूम्रपानामुळे शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी करून निरोगी राहण्याची इच्छा आहे अशांसाठी आयुर्वेदात पाच सोपे उपाय आहेत. या उपायांनी धूम्रपानाचा त्रास कमी करणे शक्य आहे.

Five Ayurvedic Remedies to Reduce Smoking Side Effects
धूम्रपानामुळे झालेला त्रास कमी करणारे पाच आयुर्वेदिक उपाय 
थोडं पण कामाचं
  • धूम्रपानामुळे झालेला त्रास कमी करणारे उपाय
  • पाच सोपे आयुर्वेदिक उपाय
  • पाच उपायांनी धूम्रपानाचा त्रास कमी करणे शक्य

Five Ayurvedic Remedies to Reduce Smoking Side Effects : धूम्रपान शरीराला हानीकारक आहे यामुळे कॅन्सर टीबी सारखे घातक आजार होण्याचा धोका आहे. पण हा धोका माहिती असूनही अनेकजण धूम्रपानाचे व्यसन सोडू शकत नाहीत. शरीराला धूम्रपानाची सवय झाली असल्याचे कारण देत अनेकजण धूम्रपान सुरू ठेवतात. ज्यांना धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे तसेच धूम्रपानामुळे शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी करून निरोगी राहण्याची इच्छा आहे अशांसाठी आयुर्वेदात पाच सोपे उपाय आहेत. या उपायांनी धूम्रपानाचा त्रास कमी करणे शक्य आहे.

  1. त्रिफळाचे सेवन करा - दररोज रात्री झोपण्याआधी एक चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन एक ग्लास पाणी प्या. यामुळे पोट साफ राहील तसेच धूम्रपानामुळे शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी होण्यास मदत होईल.
  2. तुळशीची पाने खा - दररोज दोन तीन तुळशीची पाने चावून खा. हे केल्यास धूम्रपानामुळे शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी होण्यास मदत होईल.
  3. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्या - तांब्याच्या स्वच्छ भांड्यात पिण्यायोग्य पाणी ठेवा. हे पाणी प्या. दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्या. हे केल्यास धूम्रपानामुळे शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी होण्यास मदत होईल.
  4. ओवा किंवा बडीशेप चघळा - ध्यान धारणा करा, धूम्रपानाची इच्छा झाल्यास ओवा किंवा बडीशेप चघळा अथवा पाणी प्या पण धूम्रपान करणे टाळा.
  5. जलनेती करा - दररोज जलनेती करा. जलनेती हा फुफ्फुसांशी संबंधित विकारांना दूर करणारा सोपा उपाय आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी