Teeth whitening at home: दातांचा पिवळेपणा पाच घरगुती उपायांनी घालवा, डेंटिस्टच्या ट्रीटमेंटचे पाच हजार रुपये वाचवा

Five Best And Effective Kitchen Ingredients To Whiten Teeth At Home : नियमित ठराविक घरगुती उपाय केले तर दातांचे आरोग्य उत्तम राहू शकते. दातांवरचा पिवळेपणा घालवून दातांचे सौंदर्य राखणेही शक्य होऊ शकते.

Five Best And Effective Kitchen Ingredients To Whiten Teeth At Home
दातांचा पिवळेपणा पाच घरगुती उपायांनी घालवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दातांचा पिवळेपणा पाच घरगुती उपायांनी घालवा
  • डेंटिस्टच्या ट्रीटमेंटचे पाच हजार रुपये वाचवा
  • दातांवरचा पिवळेपणा घालवून दातांचे सौंदर्य राखा

Five Best And Effective Kitchen Ingredients To Whiten Teeth At Home : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली, दातांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे यामुळे दातांवरील पिवळेपणा अर्थात टार्टर वाढते. या वाढत्या पिवळेपणामुळे दातांशी संबंधित इतर समस्यांची सुरुवात होते. दात दुखणे, दातांमधून रक्त येणे, तोंडाला दुर्गंधी येणे अशा समस्या हळू हळू सुरू होतात. समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास दात कमकुवत होऊ लागतात. नंतर डेंटिस्टकडे धाव घेतली तर उपचारांवर मोठा खर्च होतो. पण ही गंभीर परिस्थिती टाळणे शक्य आहे. नियमित ठराविक घरगुती उपाय केले तर दातांचे आरोग्य उत्तम राहू शकते. दातांवरचा पिवळेपणा घालवून दातांचे सौंदर्य राखणेही शक्य होऊ शकते.

दातांचा पिवळेपणा

दातांचा पिवळेपणा कसा घालवाल?

दातांचा पिवळेपणा घालविणारे आणि दातांचे सौंदर्य जपणारे असे पाच सोपे घरगुती उपाय आहेत. कोणीही हे उपाय घरातल्या घरात सहज करू शकतो. या उपायांनी दातांचे आरोग्य जपणे शक्य आहे तसेच दातांसाठी डेटिंस्टकडे जाऊन करावा लागणारा उपचारांवरील मोठा खर्च टाळणेही शक्य आहे. 

बेकिंग सोडा आणि मीठ

बेकिंग सोडामध्ये प्रचंड अँटी बॅक्टेरियल गुण आहेत. यामुळे बेकिंग सोडा दातांवरील पिवळेपणा घालवून दात पांढरे करण्यास मदत करतो. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात चिमुटभर मीठ घाला. हे मिश्रण दातांना चोळा. नंतर खळखळून चुळा भरा. लक्षात ठेवा बेकिंग सोड्याचा वापर मर्यादीत प्रमाणातच करा.

लिंबू रस

लिंबू रस दातांना चोळून नंतर पाण्याने चुळा भरून तोंड स्वस्छ करावे. या पद्धतीने दातांचा पिवळेपणा कमी करणे शक्य आहे. लिंबू रसातील अॅसिड दातांवरील पिवळेपणा दूर करण्यास मदत करते. लक्षात ठेवा लिंबू रसाचा वापर दातांसाठी मर्यादीत प्रमाणातच करा.

तीळ

एक चमचा तिळाचे दाणे चावून खावे. यामुळे दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आठवड्यात दोन वेळा हा प्रयोग करावा.

टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी

टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी या दोन्हीमध्ये सी व्हिटॅमिन आहे. दातांच्या स्वच्छतेसाठी या व्हिटॅमिनचा उपयोग होतो. एक टोमॅटो किंवा एक स्ट्रॉबेरी अर्धी कापा. आता कापलेला टोमॅटो किंवा स्ट्रॉबेरी दाताला चोळा. टोमॅटो किंवा स्ट्रॉबेरीचा रस दातांना लागणे आवश्यक आहे. आता पाच मिनिटे थांबा. यानंतर पाण्याने चुळा भरून दात स्वच्छ करा. 

लवंग

दात दुखणे, दातांमधून रक्त येणे अशा दातांच्या समस्यांवर 
उपाय म्हणून लवंगाचे तेल दातांच्या दुखऱ्या भागावर लावतात अथवा दुखऱ्या भागाजवळ लवंग धरून ठेवून त्याचा रस दातांना स्पर्शेल याची खबरदारी घेतात. दातांना येणारी दुर्गंधी, दात दुखणे असे दाताचे अनेक विकार लवंगाच्या मदतीने दूर करणे शक्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी