Weight Loss Tips in Marathi : Weight Loss करताय? वजन कमी करण्यासाठी हे पाच पदार्थ खा आणि पहा फरक

सध्या वजन वाढण्याची समस्या खुप जणांना सतावत आहे. त्यात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यात भर पडली आहे. शरीराची हालचाल कमी झाली आहे आणि वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा वेळी फक्त व्यायाम नव्हे तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

weight loss tips marathi
 फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या वजन वाढण्याची समस्या खुप जणांना सतावत आहे.
  • त्यात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यात भर पडली आहे.
  • अशा वेळी फक्त व्यायाम नव्हे तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

Body Fat Loss Diet In marathi: सध्या वजन वाढण्याची समस्या खुप जणांना सतावत आहे. त्यात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यात भर पडली आहे. शरीराची हालचाल कमी झाली आहे आणि वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा वेळी फक्त व्यायाम नव्हे तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे. योग्य आहारामुळे वजन होण्यास मदत होते. फक्त योग्य आहाराच नव्हे तर योग्य आहार वेळेत आणि घेणेही गरजेचे आहे. वजन कमी करताना फॅट वाढवणारे पदार्थ आपण टाळले पाहिजे यात काहीच वाद नाही. परंतु काय खाल्ले पाहिजे याचीही माहिती असणे गरजेचे आहे. कारण जर योग्य आहार घेतला नाही तर शरीराला ऊर्जा मिळणार नाही. शरीराची चरबी करण्यासाठी कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे जाणून घेऊया


ओट्समुळे होईल वजन कमी

ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. ओट्स खाल्ल्यामुळे खुप वेळ भूक लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्त खायची गरज पडत नाही. ओट्समुळे पचनशक्ती मजबूत होते. ओट्समुळे वजन कमी होण्यास मदत होते म्हणून डाईटेशन ओट्स खाण्याचा सल्ला देतात. 

पाण्याचाही होतो उपयोग 

पाणी प्यायल्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते हे फार कमी जणांना माहित आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पाणी प्यायल्यामुळे सारखी भूक लागत नाही. पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत तर होतेच. पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि त्वचाही तजेलदार होते. शरीराला किती पाण्याची गरज आहे यासाठी काही ऍप्सही उपलब्ध आहेत. योग्य प्रमाणात पाणी पिण्यासाठी नेहमी जवळ एक पाण्याची बाटली ठेवावी


एवोकाडो मुळेही होतं वजन कमी

एवोकाडे हे फळ गेल्या काही वर्षात फार लोकप्रिय झाले आहे. एवोकाडे खाल्ल्यामुळे फार वेळ भूक लागत नाही. एवोकाडे फळात विटामिन सी,अ फोलेट, पोटॅशियम, विटामिन ई आणि विटामिन के असतं. एवोकाडे खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 


सुका मेवा 

सुका मेव्यातही मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. सुका मेवा खाल्ल्यामुळे वजन कमी होतं. काजु, बदाम, मनुके आणि अक्रोड खाल्ल्यास फार वेळ भूक लागत नाही. सुका मेवा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पुन्हा पुन्हा खाण्याची गरज पडत नाही.


अंडीही आहेत फायदेशीर

एका उकडलेल्या अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी उकडलेली अंडी खाऊ शकता. अंड्यासोबत हिरव्या भाज्या टाकून तुम्ही सलाड बनवूनही खाऊ शकता.

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी