डोळ्यांच्या आरोग्यासाठी पाच सोपे घरगुती उपाय

Home Remedies for Better Eyesight in Marathi : डोळ्यांच्या वाढत्या समस्यांवर काही घरगुती सोपे उपाय आहेत. दररोज हे उपाय केले तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घ काळ उत्तम राहू शकते. चष्मा असो वा नसो प्रत्येक व्यक्ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे सोपे घरगुती उपाय सहज करू शकते.

Five Home Remedies for Better Eyesight in Marathi
डोळ्यांच्या आरोग्यासाठी पाच सोपे घरगुती उपाय 
थोडं पण कामाचं
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी पाच सोपे घरगुती उपाय
  • दररोज उपाय केले तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घ काळ उत्तम राहू शकते
  • चष्मा असो वा नसो प्रत्येक व्यक्ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी सोपे घरगुती उपाय सहज करू शकते

Home Remedies for Better Eyesight in Marathi : डिजिटल उपकरणे वाढू लागल्यापासून डोळ्यांच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. लहान वयातच अनेकांना चष्मा लागल्याचे चित्र आहे. डोळ्यांच्या वाढत्या समस्यांवर काही घरगुती सोपे उपाय आहेत. दररोज हे उपाय केले तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घ काळ उत्तम राहू शकते. चष्मा असो वा नसो प्रत्येक व्यक्ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे सोपे घरगुती उपाय सहज करू शकते. चला तर मग जाणून घेऊ डोळ्यांच्या आरोग्यासाठी सोपे घरगुती उपाय....

  1. अंजीर आणि मनुका (बेदाणे / बेदाणा / किशमिश) - डोळ्यांच्या आरोग्यासाठी दररोज रात्री एक वाटी पाण्यात एक वा दोन सुके अंजीर आणि पाच मनुका भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे भिजवलेले अंजीर आणि मनुका चावून खा. वाटीतले पाणी प्या. 
  2. गायीचे तूप (गायीचे तुप) - डोळ्यांच्या आरोग्यासाठी दररोज झोपताना पापण्यांना हलक्या हाताने गायीचे तुपाने मालीश करा. उठवल्यावर पाण्याने चेहरा, पापण्या, डोळ्यांच्या भोवतालचा भाग हलक्या हाताने धुवा. जेवणात गायीच्या तुपाचा वापर करा. 
  3. आवळा ज्युस - डोळ्यांच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक पेला (एक ग्लास) ताजा आवळा ज्युस प्या. 
  4. त्राटक - डोळ्यांच्या आरोग्यासाठी दररोज त्राटक (त्राटक ध्यान) करा. यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. नियमित व्यवस्थित त्राटक करणाऱ्यांच्या डोळ्यांच्या अनेक समस्या दूर झाल्याची उदाहरणे जगात आढळतात. मेणबत्तीच्या ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ एकाग्र चित्ताने (ध्यान लावून एकटक) बघून त्राटक करता येते. 
  5. नेत्रस्नान - डोळ्यांच्या आरोग्यासाठी दररोज नेत्रस्नान करा. यासाठी तोंडात चुळ (चुळा) भरण्यासाठी जास्तीत जास्त पाणी भरून घेऊन गाल फुगवा. यानंतर डोळे उघडे ठेवून चेहऱ्यावर पाण्याचे हलक्या हाताने १०-१५ हबके मारा. नंतर डोळे मिटून पुन्हा चेहऱ्यावर पाण्याचे हलक्या हाताने १०-१५ हबके मारा. यानंतर तोंडात धरून ठेवलेले पाणी थुकून द्या (चुळ भरा).  ज्यांना पाण्याचे हबके मारण्याची भीती वाटते त्यांनी पाणी तोंडात भरून नाक बंद करून (श्वास घेणे थांबवून) डोळे बुडतील अशा प्रकारे चेहरा पाण्यात बुडवून डोळ्यांची १०-१५ वेळा उघडझाप करावी. नंतर चेहरा पाण्याबाहेर काढून तोंडातील पाणी थुकून द्यावे (चुळ भरा).

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी