Five simple ways to reduce bloating quickly : काही वेळा अपचन अथवा बद्धकोष्ठतेमुळे पोटफुगीची समस्या निर्माण होते. पोटफुगीचा त्रास होत असल्यास अस्वस्थ वाटते. दिवसभराच्या कामावर प्रतिकूल परिणाम होतो. कामाची गती मंदावते. एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करणे कठीण होते. चिडचिड वाढते. तब्येत ढासळते. जाणून घ्या ही समस्या दूर करण्याचे पाच सोपे घरगुती उपाय.
अवेळी होणारे जेवण, चुकीच्या आहारपद्धती, जंकफूड, फास्टफूड यांचे सेवन, भूकेपेक्षा जास्त अथवा भूकेपेक्षा खूप कमी खाणे अथवा घाईघाईने खाणे यामुळे पोटफुगी होते. विशिष्ट प्रकारच्या भाज्या खाल्ल्यामुळेही पोटफुगीचा होण्याचा धोका आहे. अनेकांना सोयाबीन, कांदे, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर या भाज्या खाल्ल्यास पोटफुगीचा त्रास होतो. यावर सोपा उपाय म्हणजे आपल्याला ज्या पदार्थांमुळे त्रास होतो असे पदार्थ रात्रीच्या वेळी खाऊ नये. दुपारच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ खाल्ले तर नंतर किमान एक हजार पावले चालून चालण्याचा व्यायाम करावा. काहींनी ग्लुटेन असलेले पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ खाल्ल्यामुळेही पोटफुगीचा त्रास होण्याचा धोका असतो. या मंडळींनी ज्या पदार्थांमुळे त्रास होतो ते ग्लुटेनचे पदार्थ खाऊ नये. ग्लुटेन फ्री पदार्थ खावेत.
पोटफुगीचा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करून घेणे आरोग्याच्यादृष्टीने हिताचे आहे.
डिस्क्लेमर / Disclaimer : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.