कोरोनाची 'ही' लक्षणे दिसली तर घ्या डॉक्टरांचा सल्ला

कोरोनाची पाच लक्षणे आहेत. यापैकी एखादे जरी लक्षण आढळले तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तब्येतीची काळजी घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क घालावे.

five symptoms of covid19
कोरोनाची 'ही' लक्षणे दिसली तर घ्या डॉक्टरांचा सल्ला 

थोडं पण कामाचं

  • कोरोनाची 'ही' लक्षणे दिसली तर घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • कोरोनाची पाच लक्षणे
  • कोरोनाचा संशय आला तर दिवसभर मास्क घाला

मुंबईः हल्ली कोरोना म्हटलं की भले भले घाबरतात. काय करावे हेच समजत नाही. पण आता कोरोना संकटाला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. यामुळे कोरोना आजाराची अशी लक्षणे लक्षात येऊ लागली आहेत. प्रामुख्याने कोरोनाची पाच लक्षणे आहेत. यापैकी एखादे जरी लक्षण आढळले तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तब्येतीची काळजी घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क घालावे. five symptoms of covid19

कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण माणसाला झाल्याचे सर्वात आधी २०१९ मध्ये लक्षात आले. हा आजार २०२० मध्ये जगभर पसरला. आता जगभरातील संशोधक कोरोनावर संशोधन करत आहेत. कोरोना संदर्भातल्या निरीक्षणांची नोंद करुन त्यावर अभ्यास सुरू आहे. या अभ्यासातून कोरोनाची पाच प्रमुख लक्षणे निश्चित करण्यात संशोधक यशस्वी झाले आहेत.

सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोना या आजाराची तीन प्रमुख लक्षणे आहेत. वास न येणे आणि जीभेची चव जाणे ही आणखी काही लक्षणे पण कोरोना रुग्णांच्या बाबतीत आढळली आहेत. पण आता पाच प्रमुख लक्षणे संशोधकांनी निश्चित करुन जाहीर केली आहेत. यापैकी एखादे लक्षण जरी आढळले तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मास्क घालावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजाराची पाच प्रमुख लक्षणे

  1. ताप येणे आणि थकवा जाणवणे - आधी ताप येतो. एक ते तीन दिवसांत ताप जातो पण नंतर प्रचंड थकवा जाणवू लागतो. यआधी एवढे थकायला कधी झालेच नसावे अशी भावना रुग्णाच्या मनात निर्माण होते. ताप असो वा नसो थकव्यामुळे साध्या दैनंदिन हालचाली करणेही कठीण होते.
  2. डोळे लाल होणे - कोरोना झालेल्या रुग्णाचे डोळे खूप लाल होतात. रुग्णाला डोळे आले आहेत का, असे वाटू लागते. डोळ्यातील लालपणा निघून जावा यासाठी औषध टाकून वेळ वाया घालवला तर कोरोना आणखी बळावण्याचा धोका आहे.
  3. जीभेवर फोड येणे अथवा जीभेवर उंचवटे निर्माण होणे - अनेक कोरोना रुग्णांच्या जीभेवर फोड येतात अथवा त्यांच्या जीभेवर उंचवटे निर्माण होतात. जीभ लालसर दिसते. तोंडाची चव जाते. खातापिताना त्रास होतो. 
  4. उलटी, जुलाब, मळमळ - अनेकांना कोरोना झाल्यावर उलटी होणे, जुलाब होणे, पोटात मळमळणे अशा स्वरुपाचे त्रास होतात. पाण्यासारखे जुलाब होतात यामुळे पोट बिघडल्यासारखे वाटते. 
  5. अंगावर रॅश येणे - काही कोरोना रुग्णांच्या अंगावर रॅश येणे अर्थात पुरळण येण्याचे प्रकार घडले आहेत. पण हा प्रकार भारतात दुर्मिळ आहे. 

या पाच पैकी कोणतेही किमान एक लक्षण आढळले तरी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मास्क घालावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार आणि पथ्ये सांभाळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी