मुंबई: डोळे फडफडणे(eye flapping) साधारणपणे अशुभ(Inauspicious) मानले जाते. काही लोक याला योग्य म्हणत नाही. लोकांचा असा समज आहे की जर एखाद्या शुभ कार्याच्या आधी डोळे फडफडले तर ते चांगले नसते. यामागे कोणताही आधार नाही. मात्र शास्त्रज्ञ याला आरोग्यासंबंधी समस्या सांगतात.
डोळ्यांच्या मांसपेशी जेव्हा आखडून जाातात तेव्हा डोळे फडफडू लागतात. ही फडफड दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये हे अतिशय सामान्य असते. मात्र काही लोकांचे डोळे जोरजोरात फडफडतात. याला मेडिकल टर्ममद्ये ब्लेफेरोस्पाज्म म्हणतात.
डोळ्यांचे फडफडणे सामान्यपणे काही सेकंदापासून मिनिटांपर्यंत राहते. इतकंच नव्हे तर हा त्रास काही लोकांना काही दिवसांसाठी होऊ शकतो. मात्र यावेळी होऊ शकते की कोणताही त्रास होणार नाही. डोळ्यांचे फडफडणे हा काही त्रासदायक नसतो. मात्र हे गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.
आता प्रश्न हा आहे की डोळ्याच्या फडफडण्यामागे काय कारण असू शकते. यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांवर दबाव, झोप कमी झाल्या, खूप थकवा आल्यास, औषधांचे साईडइफेक्ट, तंबाखू तसेच दारूचे अतिसेवन . यासोबतच कंजक्टीवाइटिस अथवा पापण्यांची सूजही यासाठी जबाबदार ठरू शकते.
जर डोळ्यांचे फडफडणे दीर्घकाळासाठी राहिल्यास याचा परिणाम तुमच्या नजरेवर होऊ शकतो. याचाच अर्थ तुमची नजर कमकुवत होऊ शकते. डॉक्टर म्हणतात की यासाठी तुम्ही नियमितपणे डोळ्यांचे चेकअप करा. जर एखादे इन्फेक्शन झाल्यास त्याकडे दुर्लक्ष नको.