नवी दिल्ली : आजच्या काळात जगभरात रोगप्रतिकारक शक्ती (immune system) वाढवण्यासाठी सकस आहार आणि उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षापासून हार्ट अटॅक (Heart attack) येण्याचे प्रमाण वाढले असून त्यात मृत्यू (death) होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सर्वेक्षणानुसार (survey) जानेवारी च्या सर्वेक्षणानुसार 25 टक्के भारतीय लोक हे हार्ट अटॅक (heart attack) किंवा हायपरटेन्शन (Hypertension) किंवा त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. आपली बदलेली जीवनशैली (Lifestyle) आणि आहार यामुळे मनुष्य आजाराच्या जाळ्यात अडकला आहे.
आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. कोरोना महामारी दरम्यान लाखोंच्या संख्येने मृत्यूची नोंद झाल्यानंतर लोकांना जीवनशैलीतील आरोग्यदायी सवयींची गरज व महत्त्व समजू लागले आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पण अनेकवेळा लोकांना निरोगी आरोग्यासाठी काय खावे आणि काय नाही हेच कळत नाही. यामुळे हातात येईल ते आपल्या पोटात आपण टाकत असतो. त्याचा फायदा होणार का आपल्या शरीराला त्याचा तोटा होणार हा विचार कोणीच करत नाही. यामुळे आहारविषयी जागृक असणं आवश्यक आहे.
Read Also : आदित्य ठाकरेंचं अजून लग्न नाही म्हणून दिशा चुकली - गोगावले
तुमच्या धकाधकीच्या जीवनात याची माहिती घेणं तुम्हाला जमत नसेल तर काळजी नको जागतिक आरोग्य संघटनेने फूड अॅडव्हायजरी दिली आहे. ही अॅडव्हायजरी तुम्ही फॉलो केली तर मोठं-मोठे आजार होण्याची शक्यता कमी होते. अॅडव्हायजरीमुळे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला गंभीर जीवघेण्या आजारांपासून वाचवू शकता.
कर्करोग (cancer)
मधुमेह (diabetes)
हृदयरोग (heart disease)
हार्ट स्ट्रोक (heart stroke)
उच्च रक्तदाब (hypertension and blood pressure)
यकृत रोग (liver disease)
Read Also : IT च्या छापेमारी सत्रामुळे साखर कारखानदारांची 'साखर' वाढणार
WHO च्या मते, मीठ आणि साखर कमी करणे हा मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मिठाचे सेवन दररोज 5 ग्रॅम किंवा 1 चमचे पर्यंतच मर्यादित असावे. त्याचवेळी, साखर दररोज 50 ग्रॅम किंवा 12 चमच्यापेक्षा अधिक अजिबात खाऊ नका. तसेच 2 वर्षांखालील मुलांना दिल्या जाणार्या पूरक पदार्थांमध्ये मीठ आणि साखर घालू नका.
Read Also : खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू
WHO उच्च रक्तदाब, हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकार यांसारखे असंसर्गजन्य रोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी संतृप्त चरबी आणि ट्रान्स-फॅटचे सेवन नियंत्रित करण्याचा सल्ला देतं. कमी चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निवडणे आरोग्यदायी आहे.
डब्ल्यूएचओच्या मते, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार यांसारखे असंसर्गजन्य रोग होण्याचा धोका कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही खाण्याच्या पद्धतीमध्ये संतुलन राखणे. दररोज वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये संपूर्ण धान्य ब्राऊन राईस, गहू, डाळी आणि बीन्स, शेंगा, ताजी फळे, भाज्या, मांस, मासे, अंडी, दूध यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.
कर्करोग, लिव्हरचे रोग, हार्ट स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यांसारखे गैर-संसर्गजन्य रोग होण्याचा धोका कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही काय प्यावे याची काळजी घेणे. कोल्ड्रिंक्स, ज्यूस, फ्लेवर्ड वॉटर आणि रेडी टू ड्रिंक कॉफी यासारखी साखरयुक्त पेये सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. याशिवाय, अल्कोहोलचे सेवन कमी करावे.