Weight Loss Routine: वजन मेंटेन ठेवणे ही एक दिवसाची प्रक्रिया नसून ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया मानली जाते, त्यामुळे काही सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड भारतात जास्त आहे,त्यामुळे लोकांचे वजन वाढणे यात नवल नाही. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं खूप अवघड असतं आणि वजन काही प्रमाणात कमी झालं तरी ते टिकवणं अजिबात सोपं नसतं. याचं कारण म्हणजे आपण कुठेतरी चूक करत असतो.
वजन कमी केल्यानंतर काही चुका झाल्या तर वजन पुन्हा वाढू लागते, चला जाणून घेऊया अशा 5 सवयी ज्या तुम्ही दैनंदिन जीवनशैलीत समाविष्ट केल्या तर वजन राखण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहाल.
1.एकदा वजन काही प्रमाणात कमी झाले तर आपण व्यायाम करणे थांबवतो, ही एक मोठी चूक आहे. वजन कमी झाले तरी व्यायामाची सवय सोडू नका.
2. वजन कमी केल्यानंतर, आपल्याला अनेकदा असे वाटते की आपण आता खाण्यापिण्याच्या जुन्या सवयी पुन्हा लावू शकतो, परंतु ही वृत्ती योग्य नाही, आपण निरोगी आहार घेत रहा.
3. जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असतो, तेव्हा आपण बाहेरील जंक आणि फास्ट फूडपासून चार हात लांबच राहतो. परंतु एकदा वजन कमी झाले की पुन्हा आपण जंक फूड आणि फास्ट फूड खाऊ लागतो, हे अजिबात करू नका.
4. झोप न लागणे हे वजन वाढण्याचे मोठे कारण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते तुमचे वजन कमी असो वा जास्त, पण 7 ते 8 तासांची झोप शरीरासाठी गरजेची आहे.
5. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, यामुळे शरीर हायड्रेट राहते. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम चयापचयावर होतो आणि वजन कमी होण्यात समस्या येतात.
उच्च प्रथिने फायबरयुक्त आहार घ्या, शुद्ध कार्ब्स मर्यादित करा, साखरेचे सेवन नियंत्रित करा, याशिवाय फळे आणि भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. लक्षात ठेवा की दर दोन तासांनी हलके जेवण घेणे आवश्यक आहे, पिण्याचे पाणी कमी करू नका, शक्य तितक्या लवकर दारू पिण्याची वाईट सवय सोडून द्या. या सर्व गोष्टींसह दैनंदिन कामे करा.
( डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. )