Weight Loss: Belly Fat कमी करण्यासाठी खास पाच सोप्या Tips, सहज कमी होईल पोटावरील चरबी

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 16, 2022 | 09:00 IST

Belly Fat Lose Tips: अनेकांसाठी वाढलेलं पोट किंवा पोटाची चरबी हे चिंतेचे मुख्य कारण ठरत आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येकाच्या जीवनशैलीत बदल झालेले आहेत. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर वजन कमी करण्याच्या या टिप्स (weight loss tips) नक्की फॉलो करा.

Tips To Reduce Belly Fat)
पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय 
थोडं पण कामाचं
  • बाहेरचं रस्त्यावरील अन्न खाणे, खराब जीवनशैली आणि दिवसभर लॅपटॉपसमोर बसणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत.
  • मुलं असोत की मुली, पोटाच्या चरबीमुळे सर्वांनाच त्रास होतो. त्यात पोटाची चरबी कमी करणे देखील खूप कठीण आहे.
  • शरीराच्या इतर भागातून वजन सहज कमी होते, पण पोटातील चरबी शेवटपर्यंत तशीच राहते.

नवी दिल्ली: Belly Fat Lose Easy Tips: अनेकांसाठी वाढलेलं पोट किंवा पोटाची चरबी हे चिंतेचे मुख्य कारण ठरत आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येकाच्या जीवनशैलीत बदल झालेले आहेत. तासनतास कॉम्प्युटरवर काम करणं, उभं राहून स्वयंपाक करणं, वेस्टर्न स्टाइलच्या वॉशरूममध्ये बसणं आणि इतर अनेक बदल घडून आल्यानं पोटदुखीची (stomach) समस्या वाढली आहे. तसंच बाहेरचं रस्त्यावरील अन्न खाणे, खराब जीवनशैली आणि दिवसभर लॅपटॉपसमोर बसणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत. यामुळे आपल्या पोटात चरबी (lose belly fat) जमा होते. मुलं असोत की मुली, पोटाच्या चरबीमुळे सर्वांनाच त्रास होतो. त्यात पोटाची चरबी कमी करणे देखील खूप कठीण आहे. शरीराच्या इतर भागातून वजन सहज कमी होते, पण पोटातील चरबी शेवटपर्यंत तशीच राहते. ती कमी करण्यासाठी खूप वेळ लागतो. लठ्ठपणामुळे शरीराला अनेक प्रकारचे आजार होतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडते.  जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर वजन कमी करण्याच्या या टिप्स (weight loss tips)  नक्की फॉलो करा.

बेली फॅट म्हणजेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स  (Tips To Reduce Belly Fat)

गोष्ट पदार्थ खाणं सोडा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वप्रथम आहारातून गोड पदार्थ म्हणजे मिठाई काढून टाका. मिठाईचे सेवन फार कमी प्रमाणात करावे. शरीरातील चरबी वाढण्याचे कारण इन्सुलिन आहे. तुम्ही जितके गोड खाल तितके जास्त इन्सुलिन शरीरात सोडले जाईल आणि तुमच्या शरीरात जास्त चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे मिठाई खाणं सोडून द्या. 

अधिक वाचा-  मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला 'इथून' केली अटक

अधिक प्रोटीन घ्या

वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त डाएट घ्या. प्रोटीन पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करतात. प्रोटीन क्रेविंग कमी करते आणि मेटाबॉलिज्‍म मजबूत करते. कमी कॅलरी खाल्ल्यानं, प्रोटीन चरबीच्या विरूद्ध कार्य करते. ज्यामुळे वजन कमी होते.

भरपूर फायबर घ्या

पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फायबरमध्ये असे घटक असतात जे पाण्यात सहज विरघळतात. अन्न पचवण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. फायबर युक्त अन्न खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

कॅलरीजची काळजी घ्या

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या आहारातील कॅलरीज मोजा. दरम्यान कधीकधी कॅलरीज समजणे कठीण असते. तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात कॅलरीज कमी आहेत. यासाठी हेल्दी आहार घ्या, कॅलरीजची काळजी घेऊन नीट आहार घ्या.

भरपूर पाणी प्या

पाण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. दररोज भरपूर पाणी प्यावे. यामुळे मेटाबॉलिज्‍म योग्यरित्या कार्य करते आणि शरीर हायड्रेटेड राहते. पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. हे शरीरातून अतिरिक्त सोडियम बाहेर काढून टाकते.

अधिक वाचा- जमिनीचा वाद टोकाला, छोट्या भावाकडून कुऱ्हाडीनं थोरल्या भावाची हत्या; बारामती हादरलं

अस्वीकरण:  Times Now Marathi या लेखात नमूद केलेल्या पद्धती, आणि दाव्यांची पुष्टी करत नाही. या फक्त सूचना म्हणून घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार करण्यापूर्वी, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी