Best Manicure Tips: घरी मॅनिक्युअर करताना या स्टेप्स फॉलो करा

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2023 | 18:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Manicure Tips: हात सुशोभित करण्याच्या नावाखाली केवळ नखांवर नेलपेंट लावणे पुरेसे नाही. जर तुम्हाला हातांचा टोन सुधारायचा असेल आणि त्वचा मुलायम बनवायची असेल, तर त्यासाठी मॅनिक्युअर खूप महत्त्वाचं आहे. मॅनिक्युअर ही अशी एक ब्युटी ट्रिटमेंट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमचे हात सुशोभित करू शकता.

Follow these steps while doing manicure at home
Best Manicure Tips: घरी मॅनिक्युअर करताना या स्टेप्स फॉलो करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नखांवर केवळ नेलपेंट लावणे पुरेसे नाही
  • मॅनिक्युअर म्हणजे ब्युटी ट्रिटमेंट
  • आठवड्यातून एकदा मॅनिक्युअर करणे चांगले

Best Manicure Tips at Home: हात सुशोभित करण्याच्या नावाखाली केवळ नखांवर नेलपेंट लावणे पुरेसे नाही. जर तुम्हाला हातांचा टोन सुधारायचा असेल आणि त्वचा मुलायम बनवायची असेल, तर त्यासाठी मॅनिक्युअर खूप महत्त्वाचं आहे. मॅनिक्युअर ही अशी एक ब्युटी ट्रिटमेंट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमचे हात सुशोभित करू शकता. हात सुंदर दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा मॅनिक्युअर करणे चांगले आहे. जर तुम्हाला घरच्या घरी मॅनिक्युअर करायचे असेल तर ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी सुचवलेल्या या सोप्या टिप्स फॉलो करा. (Follow these steps while doing manicure at home)

घरी मॅनिक्युअर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

कोमट पाण्यात हात भिजवण्यासाठी एक लहान टफ घ्या, एक एमरी बोर्ड, ऑरेंज स्टिक, नेल क्लिपर, कॉटन वूल, नेल वार्निश रिमूवर, नेल वार्निश आणि हॅंड क्रीम घ्या.

नेल वार्निश काढून टाकण्यासाठी कॉटन वूल आणि नेल वार्निश रिमूवरचा वापर करा. जास्त रिमूव्हर लावू नका, कारण ते नखे कोरडे करतात. नेल क्लिपरसह नखे कापून घ्या. एमरी बोर्ड वापरून नखांना अंडाकृती आकार द्या.

अधिक वाचा:Pregnancy Tips: गरोदरपणात ऑफिसला जात असाल तर सुरक्षित मातृत्वासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

मॅनीक्योर ही एक कॉस्मेटिक ब्युटी ट्रीटमेंट आहे, जी नखे आणि हातांचे सौंदर्य वाढवते. नंतर भांड्यात थोडे कोमट पाणी ध्या आणि त्यात हात 5 मिनिटे भिजवा. त्यात बाथ जेलचे काही थेंब टाका. भिजवल्यानंतर, नखे स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रश वापरा.

नखे, क्यूटिकल आणि हातांना हँड क्रीम लावा. हातांच्या त्वचेवर मसाज करा. ओलसर टॉवेलने पुसून टाका. तुम्ही ही हँड क्रीम घरी देखील तयार केली करू शकता.

नखांच्या बेसपासून टोकापर्यंत समान स्ट्रोक वापरून नेल वार्निश लावा. नखाच्या मध्यभागी आणि नंतर दोन्ही बाजूंनी नेल वार्निश लावा आणि त्यावर तुमच्या आवडीचे नेलपेंट लावा.

अधिक वाचा: Pregnancy Exercises: बॉडी वेट मेंटेन ठेवण्यासाठी गर्भधारणेदरम्यान करा या व्यायामांचा सराव

हे देखील लक्षात ठेवा

  • आपले हात भिजवण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका, कारण यामुळे त्वचा आणि नखे कोरडे होऊ शकतात.
  • जर नखं ठिसूळ असतील तर फ्रॉस्टेड नेल वार्निश टाळा.
  • क्युटिकल्स कधीही कापू नका किंवा नखांवर कोणतीही तीक्ष्ण धातूची साधने वापरू नका.
  • जर तुमच्या नखांमध्ये संसर्ग झाला असेल तर नेल वार्निश वापरणे टाळा. वैद्यकीय मदत घ्या, कारण हे बुरशीजन्य संसर्ग किंवा सोरायसिस असू शकते.
  • हलक्या रंगाचे नेलपॉलिश लावल्यास लहान नखे लांब दिसू शकतात.
  • नेलपॉलिश काढणे टाळा. हे नखेचे संरक्षणात्मक स्तर काढून टाकू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी