Tips For Weight loss: वेटलॉससाठी फॉलो करा या ५ चांगल्या सवयी, आजपासूनच करा सुरू

तब्येत पाणी
Updated Sep 23, 2020 | 15:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Desi Tips for Weight loss:वजन कमी करण्यासाठी आपण नानाविध प्रयत्न करतो मात्र त्यानंतरही आपल्याला फायदा होत नाही. लठ्ठपणामुळे आपल्या दिसण्यावरच परिणाम होत नाही तर गंभीर आजारांचा  धोकाही वाढतो.

weight loss
वेटलॉससाठी फॉलो करा या ५ चांगल्या सवयी 

थोडं पण कामाचं

  • वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर या चांगल्या सवयी करा फॉलो
  • जाणून घ्या वजन कमी करण्याची योग्य पद्धत काय आहे
  • या चांगल्या सवयी फॉलो केल्यास तुम्ही केवळ वजनच कमी करू शकणार नाही तर निरोगीही राहू शकता. 

मुंबई: अनेकदा लोकांना असे वाटते की भरपूर तास वर्कआऊट(workout for weight loss) केल्याने आणि कमी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते(how to loose weight). आपल्या खाण्याच्या सवयीवर कंट्रोल मिळवण्यासाठी काहीजण उपवासही(fasting) करतात. मात्र वजन कमी करण्याची ही योग्य पद्धत नव्हे. यामुळे शरीरात आवश्यक असलेल्या पोषकतत्वांची(nutrients) कमतरता भासू शकते. वाढते वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे अथवा कमीत कमी जेवण घेणे हा पर्याय नव्हे. तुम्ही काही वेळ व्यायाम(exercise) आणि हेल्दी डाएटच्या(healthy diet) मदतीने वाढलेले वजन कमी करू शकता. 

आजपासूनच स्वत:ला लावून घ्या या ५ सवयी

जंक फूड, तळलेले खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक्स यांना म्हणा नाही

जंक फूड जसे पिझ्झा, पास्ता, बर्गर यासारख्या पदार्थांना नाही म्हणा. अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने तुमचे केवळ वजनच वाढत नाही तर गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. जंक फूड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैद्याचा वापर केला जातो जो पचण्यास योग्य नाही. जंक फूडशिवाय तळलेले खाद्यपदार्थही दूर ठेवा. याशिवाय सोडा, कोल्ड्रिंक्ससारखी पेयेही पिऊ नका. ही ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. 

पॉलिश केलेले नव्हे तर बिनपॉलिश केलेले धान्य वापरा

ब्राऊन राईस, ज्वारी, नाचणीचे पीठ, शिंगाड्याचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर असते. या प्रकारच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. त्यामुळे पॉलिश केलेले धान्य वापरण्याऐवजी हातसडीचे तांदूळ, बिन पॉलिश केलेली कडधान्ये वापरा. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरही असते. हे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते. 

स्नॅक्स असावे हेल्दी

संध्याकाळच्या वेळेस अनेकदा भूक लागल्याने शरीरास अनहेल्दी असलेले पदार्थ खाल्ले जातात. प्रोसेस्ड फूड, डबाबंद फळे, स्नॅक्स खाल्ले जातात. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. अशातच तुमचा संध्याकाळचा नाश्ता हेल्दी बनवा. यात चकली, थेपला, भाज्यांचे कटलेट यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. स्नॅक्स म्हणून अशा पदार्थांचे सेवन करा ज्यामुळे तुमचे पोट तर भरेल मात्र वजन वाढणार नाही. 

साखर नव्हे तर मधाचा करा डाएटमध्ये समावेश

साखरेच्या तुलनेत मध आणि गुळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. त्यामुळे साखरेऐवजी गूळ अथवा मधाचे सेवन करा. जर तुम्ही चहा अथवा कॉफीचे सेवन करत असाल तर साखरेऐवजी मधाचा वापर करा. 

व्यायाम करण्यास विसरू नका - जर तुम्हाला तुमच्या कॅलरीज अथवा फॅट बर्न करायचे असेल तर आपल्या रूटीनमध्ये व्यायामाचा समावेश जरूर करा. सकाळी उठून कमीत कमी जॉगिंग, वॉकिंग अथवा योगा करा. यामुळे तुमचे शरीर केवळ फ्लेक्सिबल राहणार नाही तर वाढते वजनही कमी होऊ शकते. तसेच सध्याच्या दिवसांमध्ये फिट राहण्यासाठी व्यायामाची खूप आवश्यकता आहे. 

(प्रस्तुत लेखात देण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहिती आहे. कोणतीही टिप्स फॉलो करण्याआधी तुम्ही तुमच्या आरोग्यतज्ञांचा सल्ला जरूर घ्या. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी