नवी दिल्ली: आपल्या शरीरात यूरिक अॅसिड (Uric Acid)तयार होते. जेव्हा प्युरीन नावाचं रसायन शरीरात तुटतं तेव्हा त्याला युरिक अॅसिड म्हटलं जातं. लिव्हर, बिअर, मटार, बीन्स, अँकोव्ही फिश (liver, beer, peas, beans, anchovies fish) यांसारखे प्युरीन समृद्ध पदार्थ आहेत. हे पदार्थ खाल्ल्यास शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढते. यूरिक अॅसिड असं टॉक्सिनं आहे जे आपल्या सर्वांच्या शरीरात तयार होते. किडनी यूरिक अॅसिड फिल्टर करतात आणि शरीरातून सहजपणे काढून टाकतात.
जेव्हा शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते आणि मूत्रपिंड शरीराबाहेर फिल्टर करू शकत नाहीत, तेव्हा हे रसायन शरीरात सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या रुपात जमा होऊ लागते. शरीरात यूरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. यामुळे पाय दुखणे, अंग दुखणे आणि पायाची बोटे आणि टाचेला सूज येते. औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून आपण यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करू शकतो.
यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी काही फळे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही फळं यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रण करण्यात प्रभावी ठरतात. काही फळाचं स्वरुप असं असतं की ते यूरिक अॅसिडवर सहज नियंत्रण ठेवू शकतात आणि ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकू शकतात.
चेरी या फळापासून यूरिक अॅसिड करा नियंत्रित
चेरीचं सेवन केल्यानं यूरिक अॅसिड नियंत्रणात राहते. शरीरातील यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी चेरीमध्ये असलेलं अँथोसायनिन्स नावाचे नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म खूप प्रभावी ठरते. चेरी खाल्ल्यास शरीराताली सूज आणि जडपणाची समस्या दूर होते. तसंच चेरी खाल्ल्यानं गाऊट अटॅकचा धोका कमी होतो आणि याशिवाय क्रिस्टल्सच्या स्वरुपात सांध्यांमध्ये यूरिक अॅसिड जमा होत नाही.
सफरचंद यूरिक अॅसिडवर करते नियंत्रण
रोज सफरचंद खाल्ल्यानं यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. रोजच्या आहारात किमान 2 सफरचंदांचा समावेश करावा. यामुळे यूरिक अॅसिडवर नियंत्रण राहिल याशिवाय त्याची लक्षणेही दूर होतील.
या फळांचं करा सेवन
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी राहते. या सर्व बेरी यूरिक अॅसिडला क्रिस्टल्सच्या स्वरूपात सांध्यामध्ये जमा होण्यापासून रोखतात. बेरीमध्ये असलेले फायबर रक्तातील यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.
लिंबाचा ही करा वापर
यूरिक अॅसिड वाढले असल्यास अर्ध्या लिंबाचा रस ग्लासभर पाण्यात टाकून प्या. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते जे यूरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करते.