Expert Tips: आपल्या मुलांचं जेवण कसं असावं,जाणून घ्या ऋजुता दिवेकरच्या टीप्स

तब्येत पाणी
Updated Jan 23, 2020 | 20:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dinner for Kids: आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि मेंदूचा विकास व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल, तर त्यांचा आहार आणि रूटीनवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याबाबतच जाणून घ्या ऋजुता दिवेकरच्या टीप्स

Dinner for Kids
आपल्या मुलांचं जेवण कसं असावं,जाणून घ्या रुजुता दिवेकरच्या टीप्स  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • मुलांना काय जेवणार हे विचारू नये, उलट आज आपण हे खाणार आहोत असं सांगावं
  • आठवड्यातून सहा दिवस पौष्टिक आहारच मुलांना द्यावा, एक दिवस त्यांच्या आवडीचं खावू द्यावं
  • रात्रीच्या जेवणात नेहमी पारंपरिक पदार्थच द्यावेत

मुंबई: लहान मुलांना अधिक अॅक्टिव्ह बनविण्यासाठी आणि त्यांचा शारीरिक-मानसिक विकास चांगला होण्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष देणं महत्त्वाचं असतं. कुठलीही स्पर्धा असो किंवा त्यांचं आरोग्य सर्वच बाबतीत आपलं मुल अग्रेसर असावं असं पालकांना वाटत असतं. मात्र योग्य खाणं-पिणं नसेल तर मुलांच्या आरोग्यावर आणि वाढीवर त्याचा परिणाम होतो.

मुलं खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूपच चूजी असतात. त्यांना पौष्टिक खाऊ घालणं म्हणजे आईसाठी ती एक सर्कसच असते. कारण मुलांना स्नॅक्स, आयस्क्रिम, चॉकलेट्स हे खूप आवडतात. त्यात आई पौष्टिक पदार्थ देत असेल तर ते खाणं मुलं टाळतात. अशावेळी मुलांना आवडेल अशापद्धतीनं पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यात आईची कसोटी लागत असते. मुलांच्या वाढीसाठी ज्याप्रकारे सकाळचा नाश्ता गरजेचा असतो, त्याचप्रमाणे रात्रीचं जेवणही तितकंच महत्त्वाचं असतं. दुसरा संपूर्ण दिवस त्यांची एनर्जी कायम राहावी, यासाठी रात्रीचं जेवण हे पौष्टिक पण पचायला हलकं असावं.

आठवड्यातील सहा दिवस द्या पौष्टिक जेवण

सेलिब्रेटी न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकरनं इंस्टाग्रामवर मुलांसाठी १२ आठवड्यांचा फिटनेस प्रोजेक्ट पोस्ट केला आहे. सोबतच डिनरमध्ये कोणते पदार्थ मुलांना देऊ नये हे सुद्धा ऋजुतानं आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना आठवड्यातून सहा दिवस पौष्टिक आहार द्यायलाच हवा, असं ऋजुता  म्हणते. यात वरण, भात, खिचडी, पोळी आणि भाजी इत्यादींचा समावेश आहे. ऋजुता दिवेकर यांच्या मते भारतीय पारंपरिक पदार्थ मुलांना खाऊ घातले पाहिजे आणि रात्रीच्या जेवणात वैविध्य असलं पाहिजे. जेणेकरून पचायला हलके पण पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटात जातील. पारंपरिक जेवणाची सवय मुलांना नेहमी आरोग्यशाली ठेवतील कारण, आपलं पारंपरिक जेवण हेल्दी असतं, मग ते कुठल्याही राज्यातील असो.

रात्रीचं जेवण हे पारंपरिक पद्धतीचंच असावं

प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता  दिवेकर म्हणते, कधीही मुलांना काय खायचं आहे ते विचारू नका, उलट त्यांना आपण आज हे खाणार आहोत असं सांगा. रात्रीच्या जेवणात पोळी, भाजी, वरण, भात किंवा खिचडीचा समावेश असावा आणि रात्री ८ वाजेपूर्वी जेवण करावं. विशेष म्हणजे जेवणात शूद्ध तुपाचा समावेश असावा.

रात्री मुलांच्या जेवणाबाबत हे नियम पाळा-

  • डिस्क्लेमर: वरील लेखामध्ये दिलेल्या टीप्स आणि सल्ला ही सामान्य माहिती आहे. याचा वापर करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...