Mushrooms for Diabetes: रक्तातील साखर वाढतेय, तर आताच जेवणात ‘हे’ खाणं सुरू करा

तब्येत पाणी
Updated Jan 29, 2020 | 18:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Mushroom blood sugar control: जर आपल्या रक्तातील साखर फ्लक्चुएट होत असेल किंवा वाढत असेल तर आपल्याला मशरूम खाणं सुरू करायला हवं. मशरूममध्ये रक्तातील साखर कंट्रोल करण्याचे गुण असतात.

mushroom
रक्तातील साखर वाढतेय, तर आताच जेवणात ‘हे’ खाणं सुरू करा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी दररोज मशरूम खावेत.
  • मशरूमचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो.
  • मशरूम खाल्ल्यास फक्त रक्तातील साखरच नाही तर वजनही नियंत्रणात राहतं.

Mushroom: जर आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वारंवार वाढत असेल तर शक्य आहे की, आपण मधुमेहाचे रुग्ण व्हाल. डायबिटीजपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील. सोबतच आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश असावा ज्यानं रक्तातील साखर कमी होईल. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त आपण साखर किंवा गोड पदार्थ खाणं सोडून द्यावं, हाच पर्याय नसतो. तर जे पदार्थ आपण खातो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणं आवश्यक आहे.

जेणेकरून आपण जे पदार्थ खातोय ते लगेच साखरेमध्ये बदलून रक्तात सामिल होऊ नये. लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ले तर ते साखरेमध्ये खूप हळुहळू परिवर्तीत होतात. रक्तातील साखर कमी करणारा असाच एक पदार्थ आहे मशरूम. ब्लड शुगर कंट्रोल करण्याचं काम मशरूम करतं.

अशाप्रकारे काम करतं मशरूम, रक्तातील साखर राहते नियंत्रणात

पांढऱ्या रंगाचे बटन मशरूम जेवढे खाण्यासाठी चविष्ट आहेत तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मशरूम खाल्ल्यानं आतड्यांमध्ये खूप चांगले बदल होतात. आतड्यांमधील बदलांसोबतच ग्लूकोजचं रेग्युलेशन सुद्धा सुधारण्याचं काम मशरूम करतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि फ्लेक्चुएशनची शक्यता कमी होऊन जाते. यामुळे हृदयाशी निगडित आजार आणि स्ट्रोकची भीती सुद्धा कमी होऊन जाते.

 

 

मशरूममध्ये असतात मधुमेह विरोधी गुण

मशरूममध्ये शून्य कॅलरी असते. व्हिटॅमिन बी २ आणि बी ३, सेलेनिअम आणि फॉस्फोरसनं परिपूर्ण मशरूम खाल्लानं पोट भरलेलं राहतं. मशरूमचं ग्लायसेमिक इंडेक्स १०-१५ असतं आणि ग्लायसेमिक लोड कमी असल्यामुळे पहिले तर भूक लागत नाही आणि दुसरी गोष्ट रक्तातही शुगर जात नाही. मशरूम खाल्ल्यानं खूप काळापर्यंत शरीरात असलेल्या ग्लुकोजद्वारेच काम सुरू राहतं. त्यामुळे शुगर वाढत नाही आणि वजन सुद्धा मेंटेन राहतं. अनेक शोधांमध्ये तर हे सुद्धा सांगण्यात आलंय की, मशरूम खाल्ल्यास गरोदरपणात होत असलेल्या डायबिटीजची शक्यता सुद्धा टाळता येते.

इंसुलिनची प्रतिकारशक्ती अधिक सुधारते

मशरूम डायबिटिक डाएटचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरू शकतो. मशरूमचा वापर आपण डाएटमध्ये अनेक पद्धतीनं करू शकतो. यात असलेलं पॉलिसेकेराईड ब्लड शुगरची लेव्हल कमी करणं आणि इंसुलिनची प्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. मशरूम आपली पाचनशक्ती कमी करतं आणि शरीराद्वारे केलं जाणारं शुगरचं अवशोषण पण स्लो करतं.

त्यामुळे जर आपल्या घरात कुणी मधुमेहाचे रुग्ण असतील किंवा आपल्या घरात कुणाला मधुमेहाची हिस्ट्री असेल आणि आपली शुगर कमी-जास्त होत असेल तर आपण आपल्या आहारात मशरूमचा वापर सुरू करून देणं फायदेशीर ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...