Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करत आहात मग तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा

For Weight Loss Always remember Three Things : वजन कमी करू इच्छिणाऱ्या तसेच वजन कमी करत असलेल्या प्रत्येकाने तीन पथ्य कायम पाळली पाहिजे.

For Weight Loss Always remember Three Things
वजन कमी करत आहात मग तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करत आहात मग तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
  • तीन पथ्य पाळल्यास वजन कमी करणे होईल सोपे
  • जाणून घ्या ही तीन पथ्य

For Weight Loss Always remember Three Things : हल्ली अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन करतात. वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करून वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण वजन कमी करू इच्छिणाऱ्या तसेच वजन कमी करत असलेल्या प्रत्येकाने तीन पथ्य कायम पाळली पाहिजे.

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. बाहेरचे खाणे टाळा तसेच फास्टफूड आणि जंकफूड टाळा : वजन कमी करू इच्छिणाऱ्या तसेच वजन कमी करत असलेल्या प्रत्येकाने बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे तसेच तेलकट तुपकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी फास्टफूड आणि जंकफूड यांच्यापासून चार हात दूर राहिले पाहिजे. ताजी फळे आणि घरी तयार केलेले ताजे सकस अन्न खावे. 
  2. प्रोटीन आणि फायबर : वजन कमी करताना अशक्तपणा येणार नाही तसेच पचनाशी संबंधित विकार निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबर यांचा समावेश करावा. दूध, पनीर, सॅलड, ताजी फळे आणि घरी तयार केलेले ताजे सकस अन्न खावे. वरण, आमटी, घरी तयार केलेले भाज्यांचे सूप प्यावे. पाकिटातून मिळणारा सूप मसाला वापरून सूप करणे आणि पिणे टाळा.
  3. दररोज वजन करण्याची सवय : वजन कमी करू इच्छिणाऱ्या तसेच वजन कमी करत असलेल्या प्रत्येकाने दररोज वजन करण्याची सवय सोडून द्यावी. डाएटमधील निवडक पदार्थांमुळे वजन वाढते आणि आहारातील इतर पदार्थ तसेच दररोज खेळणे किंवा व्यायाम करणे यामुळे हळू हळू वजन कमी होते. यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार ठराविक दिवसांच्या अंतराने वजन तपासून घ्यावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी