Orange Peel Benefit: संत्र्याच्या सालीमुळे कमी होतं वजन, जाणून घ्या कसा करायचा वापर

तब्येत पाणी
Updated Jan 07, 2020 | 15:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

हिवाळ्यात संत्री खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, मात्र संत्र्याच्या सालींचाही वजन कमी करण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. जाणून घ्या कसा होतो वेट लॉसमध्ये संत्र्याच्या सालींचा उपयोग...

Orange peel
संत्र्याच्या सालीमुळे कमी होतं वजन, जाणून घ्या कसं वापरायचं  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

 • संत्र्याचं साल वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर
 • व्हिटॅमिन बी-६, कॅल्शिअम, प्रोव्हिटॅमिन एक, फॉलेट आणि पॉलिफेनॉल्सनं परिपूर्ण असतात संत्री
 • संत्र्याच्या सालींमध्ये असतं फायबर, हे फायबर पाण्यात सहजतेनं विरघळतं

Orange Peel Benefit: जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही विविध फॅट बर्निंग उपाय शोधत असाल, तर लगेच संत्र्याच्या सालींचा उपयोग करणं सुरू करा. संत्री व्हिटॅमिन सीनं परिपूर्ण असतात. हिवाळ्यात आपण आवडीनं संत्री खातो. मात्र असं करतांना संत्र्यांची साल आपण फेकून देत असतो. पण हीच संत्र्याची साल आपलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

 

 

व्हिटॅमिन सी युक्त संत्री आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आपली पाचनक्रिया चांगली करते. तर संत्र्याच्या सालींमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. व्यायाम करण्यासोबतच जर आपण संत्र्यांची साल आपल्या रोजच्या आहारात वापरणं सुरू केलं तर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसू शकतील.

जाणून घ्या कसा होतो संत्र्याच्या सालींचा वेटलॉससाठी उपयोग, पाहा फायदे-

 • व्हिटॅमिन बी-६, कॅल्शिअम, प्रोव्हिटॅमिन एक, फॉलेट आणि पॉलिफेनॉल्सनं परिपूर्ण संत्री वजन कमी करण्यासोबतच शुगर आणि अल्जाइमरच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर ठरतात. संत्री खाण्यासोबतच त्याच्या सालींचं पावडर बनवून ते वापरल्यानं याचा दुप्पट फायदा होतो.
 • संत्र्यात असलेले फायबर पाण्यात सहजतेने विरघळतात आणि त्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया झपाट्यानं वाढते. संत्र्याचं साल मेटॅबॉलिक रेट वाढवतं, यामुळे शरीरात जमा असलेली चरबी झपाट्यानं विरघळते.
 • जर आपल्याला अधिक भूक लागत असेल तर आपण संत्र्यासोबतच त्याचं साल सुद्धा खावं. संत्र्याच्या सालांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे आपलं पोट खूप वेळेपर्यंत भरलेलं वाटेल. एव्हढंच नव्हे तर आतड्यांची स्वच्छता करण्यासाठीही याचा खूप वापर होतो.
 • जाणून घ्या कसा करायचा संत्र्याच्या सालींचा उपयोग
 • संत्र्याच्या सालींचा चहा बनवायचा. यासाठी संत्र्याचं साल उकळत्या पाण्यात टाकावं आणि पाणी उकळून अर्ध झालं की ते गाळून प्यावं.
 • सूप, स्मूदी किंवा सलादच्या रुपातही संत्र्याचं साल आपण खाऊ शकता. यासाठी संत्र्याच्या सालींचे लहान-लहान तुकडे करावे आणि त्याचा वापर करावा.
 • संत्र्याच्या साली वाळवून त्याचं पावडर तयार करावं. हे पावडर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये मिसळून आपण वापरू शकता.
 • संत्र्याच्या साली नेहमी सावलीमध्ये वाळत घालाव्यात, जेणेकरून त्यातील पोषकतत्त्व कायम राहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी