Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त हे चार उपाय, आणि पहा चमत्कारिक फरक

Weight Loss Tips in Marathi : वजन वाढण्याची समस्या ही फार सामान्य बाब झाली आहे. परंतु वजन कमी करणे हे वेगळेच आव्हान असतं. त्यासाठी डाएट, व्यायाम कधी कधी तर पथ्यंही पाळावी लागतात. यामुळेही वजन कमी होईलच असे नाही. वजन कमी करण्यासाठी काही नियम पाळले तर नक्की फरक पडेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी फक्त चार उपाय केले तर नक्की फरक पडेल.

weight loss tips in marathi
वजन कमी करण्यासाठी मराठीतून टिप्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन वाढण्याची समस्या ही फार सामान्य बाब झाली आहे.
  • परंतु वजन कमी करणे हे वेगळेच आव्हान असतं.
  • वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी फक्त चार उपाय केले तर नक्की फरक पडेल.

Weight Loss Tips in Marathi :  वजन वाढण्याची समस्या ही फार सामान्य बाब झाली आहे. परंतु वजन कमी करणे हे वेगळेच आव्हान असतं. त्यासाठी डाएट, व्यायाम कधी कधी तर पथ्यंही पाळावी लागतात. यामुळेही वजन कमी होईलच असे नाही. वजन कमी करण्यासाठी काही नियम पाळले तर नक्की फरक पडेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी फक्त चार उपाय केले तर नक्की फरक पडेल. जाणून घेऊया त्या चार उपायांबद्दल.


वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा चार उपाय


कोमट पाणी

Right Way for Drinking Water

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील फॅट कमी होतं आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास फार वेळ भूक लागत नाही आणि त्यामुळे जास्त न खाल्ल्यास वजन कमी होतं. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यास पचनशक्ती मजबूत होते. 

अधिक वाचा :  Jackfruit: 'या' लोकांसाठी घातक आहे पोषक असलेला फणस; शरीरातील ऑक्सिजन पुरवठा होईल कमी

उन घ्या

Sunlight is very Important

सकाळी कोवळ्या उन्हातून शरीराला आवश्यक विटामिन मिळत. म्हणून सकाळी कोवळे उन अंगावर घ्यावे. तसेच शक्य झाल्यास त्वचेवर सनस्क्रीन लावावे त्यामुळे त्वचेचे घातक किरणांपासून संरक्षण होतं. 

अधिक वाचा :  Diwali 2022: स्नॅक्स आणि मिठाईमुळे होऊ शकते Acidity, या Drinks मुळे लगेच मिळेल आराम


नाष्ट्यामध्ये प्रोटीनचा समावेश 

Benefits of Breakfast

आरोग्यदायी शरीरासाठी सकाळचा नाष्टा गरजेचा असतो. तसेच नाष्ट्यामुळे वजन वाढू नये त्यासाठी प्रोटीनचा समावेश असलेला नाष्ट्या घ्यावा. प्रोटीन असलेल पदार्थ सकाळी खाल्ल्यास फारवेळ भूक लागत नाही. तसेच फार वेळ भूक न लागल्याने ओवर इटिंगची समस्या होत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा :Diabetes Control: या 5 नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून मधुमेहावर मिळवा नियंत्रण


व्यायाम करा

Exercise for health

सगळा डाएट फॉलो केल्यानंतर व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. योग्य वेळेत व्यायाम केल्यावरच डाएटचा फायदा होत. एका अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी दुपारी किंवा सांयकाळच्या व्यायामापेक्षा सकाळचा व्यायाम फायदेशीर ठरतो. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी