Nail indicates health : वारंवार नखं तुटतायत? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं

तुमच्या नखांचा रंग बदलत असेल किंवा नखं तुटत असतील, तर ते गंभीर आजाराचं लक्षण मानलं जातं. नखांवर लक्ष ठेवलं तर अनेक गंभीर आजारांचे संकेत मिळू शकतात.

Nail indicates health
वारंवार नखं तुटतायत? असू शकतो गंभीर आजार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नखं देतात आरोग्याची खबरबात
  • नखांचा रंग बदलणे आजारांचे संकेत
  • पिवळी नखं असतात इन्फेक्शनची सूचना

Nail indicates health : स्वच्छ आणि सुंदर नखं (Beautiful Nails) ही जशी व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालतात, तशीच ती व्यक्तीची शारीरिक अवस्थाही (Physical Condition) दाखवणारी असतात. आपल्या आरोग्यावर (Health) काही विपरित परिणाम होत असेल किंवा शरीरात काही गंभीर आजार उत्पन्न होत असेल, तर त्याचे प्राथमिक संकेत (Initial Signals) हे अनेकदा नखांवाटे मिळायला सुुरुवात होते. नखं तुटणे, त्यांचा रंग बदलणे किंवा नखांचं स्वरुप बदलणे यासारख्या लक्षणांमधून आपल्या आरोग्याबाबतचे वेगवेगळे संकेत मिळत असतात. जाणून घेऊया नखांच्या बाबतीत काय घडलं की कशाचा संकेत मिळतो, याबाबत. 

नखं आणि लक्षणं

कोरडी पडणारी, तुटणारी किंवा दुभंगणारी नखं ही थायरॉईडच्या समस्येची निदर्शक असतात. नखांना पिवळसर रंग येऊ लागणं हे कुठल्या ना कुठल्या फंगल इन्फेक्शनचं लक्षण मानलं जातं. नखं पांढरी पडणं, गुलाबी रंगाचे चट्टे नखांवर उमटणं, वारंवार नखं तुटून पडणं यासारख्या बाबी शरीरात कुठला ना कुठला आजार जन्म घेत असल्याचे संकेत देत असतात. यकृत, हृदय किंवा किडणीशी संबंधित आजारांवर नखांच्या आरोग्यावरून बारिक लक्ष ठेवता येऊ शकतं. त्यासाठी कुठल्या लक्षणाचा काय अर्थ असतो, हे जाणून घेणं आवश्यक आहे. 

पांढरी पडणारी नखं

काहीजणांची नखं निस्तेज होतात आणि अचानक पांढरी पडतात. त्या रंगांची रयाच निघून जाते. अनेकदा काही गंभीर जखम झाल्यामुळेही नखं पांढरी पडतात. त्याचप्रमाणं ॲनिमिया, कुपोषण, हृदयरोग किंवा किडणीशी संबंधित विकार यापैकी कुठलंही कारण यामागे असू शकतं. 

पिवळी पडणारी नखं

पिवळी पडणारी नखं हा फंगल इन्फेक्शनचा परिणाम मानला जातो.  जेव्हा इन्फेक्शन वाढू लागतं, तेव्हा नखांची पकड सैल होत जाते. त्यामुळे नखं उचकटली जाण्याची किंवा तुटण्याची शक्यता निर्माण होते. अनेकदा पिवळी पडलेली नखं ही गंभीर आजारांचा संकेत मानली जातात. थायरॉइड,लंग्ज, डायबेटिस किंवा सोरायसिस यासारख्या आजारात नखं पिवळी पडल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Chia Seeds Benefits: वजन कमी करण्यासोबतच चिया बिया या आजारांपासूनही वाचवतात, जाणून घ्या कसे करायचे सेवन

निळी नखं

शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचं हे लक्षण असतं. न्यूमोनियासारख्या गंभीर आजाराचंही हे लक्षण मानलं जातं. काही प्रकरणांत निळी नखं ही हृदयरोगाचा संकेतही समजली जातात. 

नखांवर ठेवा लक्ष

काही आजारांची प्राथमिक लक्षणं दिसतात, तर काही आजार मात्र कुठलीही लक्षणं न दाखवता अचानक उद्भवतात. मात्र नखांच्या आरोग्याकडे आणि लक्षणांकडे लक्ष ठेवलं, तर अनेक आजारांची पूर्वकल्पना मिळायला मदत होते. वेळीच आपला आजार ओळखून त्यावर उपचार करता येतात आणि आजार गंभीर स्वरुप घेण्याअगोदरच बरा करता येतो. 

अधिक वाचा - Health Tips: सकाळी उठल्यावर करा 'हे' काम, आरोग्याला होईल जबरदस्त फायदा

डिस्क्लेमर - नखांच्या लक्षणांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत किंवा आरोग्याबाबत काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी