Health benefit of peas: फ्रोजन की ताजी मटार कोणता आहे हेल्दी ऑप्शन, खाण्याआधी द्या लक्ष

तब्येत पाणी
Updated Jan 03, 2022 | 15:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Frozen or fresh peas: ताजी मटार फ्रोजन मटारच्या तुलनेत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. व्हिटामिन, आर्यन आणि मॅग्नेशियमने भरूपर असलेली मटार गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यास तसेच संक्रमणापासून दूर राखण्यास मदत करते.

peas
फ्रोजन की ताजी मटार कोणता आहे हेल्दी ऑप्शन, जाणून घ्या 
थोडं पण कामाचं
  • ताजी मटार फ्रोजन मटारच्या तुलनेत आरोग्यासाठी फायदेशीर
  • अँटी ऑक्सिडंटने भारपूर असलेल्या मटारमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. 
  • गर्भवती महिलांसाठी ताजी मटार एखाद्या औषधापेक्षा नाही कमी

मुंबई: थंडीच्या दिवसांता आलूमटार भाजी अथवा मटार पुलाव(matar pulao) अतिशय आवडीने खाल्ला जातो. मटार केवळ खाण्यासाठीच स्वादिष्ट नसतात तर याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. फायबर आणि प्रोटीनने भरलेले मटार(peas) ब्लड शुगर(blood sugar) नियंत्रित करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. तर मटारमध्ये सूज कमी करण्यासाठीचे अनेक अँटी ऑक्सिडंट(anti oxidant) गुण असतात ज्यामुळे हृदयासंबधित आजारांशी लढण्यास तसेच हार्ट अॅटॅकची(heart attack) शक्यता कमी होण्यास मदत होते. मात्र मटारबाबत अनेक लोक कन्फ्युज असतात की कोणती मटार खावी फ्रोजन की ताजी मटार.

ताजी मटार केवळ थंडीच्या दिवसांत उपलब्ध असते. त्यामुळे मटार स्टोर करण्यासाठी फ्रीजमध्ये टाकतात.  ज्याला आपण फ्रोजन मटार म्हणतात. फ्रोजन मटार तुम्ही वर्षभर वापरू शकता. ताजी मटार फ्रोजन मटारच्या तुलनेत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. 
ताज्या मटारचे फायदे

ताजी मटार आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. व्हिटामिन, आर्यन, मॅग्नेशियमसारख्या गंभीर आजांरापासून सुटका मिळते. तसेच संक्रमणापासून दूर रोखण्यास मदत होते. १७० ग्रॅम मटारच्या दाण्यामध्ये ६२ ग्रॅम कॅलरी, ११ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, फायबर ४ ग्रॅम आणि प्रोटीन ४ ग्रॅम. 

रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 

अंटी ऑक्सिडंट भरपूर असलेल्या मटारमध्ये रोगप्रतिराक क्षमता मजबूत करण्यासाठी अनेक गंभीर आजारांपासून सुटका मिळते. यातील व्हिटामिन्स आपल्याला हंगामी आजारांच्या संक्रमणापासून दूर राखण्यास मदत करतात. 

गरोदर महिलांना फायदा

गरोदर महिलांसाठी मटार अतिशय फायदेशीर आहे. यात फोलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. तसेच फोलोड्स एक कॉम्प्लेक्स व्हिटामिन आहे. जे गरोदर महिलांसाठी अतिशय फायदेशीर असतात. 

फ्रोजन मटारचे सेवन करावे की नाही

मटार केवळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात उपलब्ध असते. नंतरच्या दिवसांत मटार खाण्यासाठी त्याला स्टोर करून ठेवले जाते. आरोग्य तज्ञांच्या मते फ्रोजन मटारचे सेवन करू नये. कोणतीही भाजी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची पोषकतत्वे संपतात. जर तुम्हाला मटार खाणे आवडत असेल तर महिन्यात एक ते दोन वेळा फ्रोजन मटारचे सेवन करू शकता. जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत...

असे करा स्टोर

उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्हाला मटारचा स्वाद घ्यायचा असेल तर ते नीट सोला. छोटे मटारचे दाणे वेगळे करा कारण ते लवकर खराब होता. जर तुम्हाला सालासह मटार स्टोर करायचे असतील तर पेपर बॅगमध्ये लपेटून फ्रीझरमध्ये ठेवा.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी