Health benefits of Garlic: डाळ आणि भाजीत लसणाचा तडका दिल्याने त्याचा स्वाद आणखी वाढतो. कोणत्याही पदार्थाला चविष्ट बनवण्यासाठी लसणाचा हलकासा फ्लेवर पुरेसा आहे. मात्र, लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर अनेक आजारांपासून तुमचा बजाव सुद्धा करतं हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही लसणाच्या दोन पाकळ्या रिकाम्यापोटी खाल्ल्या तर तुमच्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदात सुद्धा लसणाला गुणधर्मांची खाण म्हटलं आहे.
जर तुम्हाला दातदुखी किंवा दातांच्या संदर्भातील काही समस्या जाणवत असतील तर लसणाची एक पाकळी तुम्हाला दिलासा देण्यासाठी पुरेसी आहे. लसणात अँटीबॅक्टेरिअल आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे दातदुखीपासून तुम्हाला आराम मिळतो. ज्या ठिकाणी वेदना होत आहेत त्या ठिकाणी लसणाची एक पाकळी बारीक करुन लावा.
हे पण वाचा : नवरात्रीत हे स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला देतील जबरदस्त एनर्जी
जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर लसूण खाणे तुमच्यासाठी आरोग्यदायक, फायदेशीर ठरू शकते. लसूण तुमची पचनसंस्था बरी करते. यामुळे तुमची भूक वाढते. अनेकदा पोटात अॅसिड तयार होऊ लागते आणि अशावेळी लसूण खाल्ल्यास ते पोटात अॅसिड तयार होण्यापासून रोखते. यामुळे तुम्हाला तणावापासूनही आराम मिळतो.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
धमन्या कधीकधी आपला लवचिकपणा गमावतात. पण लसूण त्यांना लवचिक बनवण्यास मदत करते. लसूण हे फ्री ऑक्सिजन रॅडिकल्सपासून हृदयाचे संरक्षण करण्याचे मदत करतात.
पोटाशी संबंधित समस्यांसाठी लसूण फायदेशीर ठरते. लसणाच्या सेवनाने तुमच्या पोटातील विषारी पदार्थ साफ होण्यास मदत होते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. कोणताही उपाय करण्यापूर्वी या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)