Garlic Side Effects: जास्त लसूण खाल्ल्याने शरीरात निर्माण होतात अनेक समस्या

निरोगी आरोग्यासाठी हिरवा भाजीपाला (vegetables) खाणं आवश्यक असतं. इतर भाज्यांप्रमाणे लसूणमध्येही (Garlic) अनेक पोषक तत्व असतात. शाकाहारी असो की मांसाहारी प्रत्येक प्रकारच्या डिशमध्ये लसूण घातले जाते.

Eating too much garlic causes many problems in the body
जास्त लसूण खाल्ल्याने शरीरात निर्माण होतात अनेक समस्या   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लसणाचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
  • काही लोकांना लसूण खाण्याची अॅलर्जी होत असते. ज्यामुळे सूज येत असते.
  • गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना लसणाचे सेवन सुरक्षित आहे.

Garlic Side Effects: निरोगी आरोग्यासाठी हिरवा भाजीपाला (vegetables) खाणं आवश्यक असतं. इतर भाज्यांप्रमाणे लसूणमध्येही (Garlic) अनेक पोषक तत्व असतात. शाकाहारी असो की मांसाहारी प्रत्येक प्रकारच्या डिशमध्ये लसूण घातले जाते. कारण हे केवळ पदार्थांची चव वाढवण्यास मदत करत नाही तर आरोग्यासाठी अनेक जबरदस्त फायदे देखील प्रदान करतात. (Eating too much garlic causes many problems in the body)

अधिक वाचा  : पुष्पा-2साठी अल्लू अर्जुनचं मानधन ऐकून येईल चक्कर

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या लसणाचे अनेक फायदे आहेत. तर इतर भाज्यांप्रमाणेच याचेदेखील काही दुष्परिणाम आहेत, याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ या बहुमुखी औषधी वनस्पतीचे तोटे काय आहेत. 

लसूण खाण्याचे काय तोटे आहेत


पचनाशी संबंधित समस्या

लसणाचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस, अतिसारचा त्रास होत असतो. लसणात फ्रक्टन आढळतो, जो एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. काही लोकांना ते पचणे कठीण होते.

अधिक वाचा  :  CNG-PNG किंमत झाली कमी, चेक करा नवीन रेट लिस्ट

त्वचेची समस्या

काही लोक लसणाचा उपयोग त्वचेसाठी करतात. परंतु असे केल्याने चिडचिड आणि लालसरपणाची समस्या उद्भवू शकते. कारण लसणात सल्फर संयुगे असतात, जे त्वचेसाठी कठोर ठरु शकतात. 

रक्तस्त्राव विकार

रक्तस्त्रावाचा विकार आणि रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या घेणाऱ्या लोकांसाठी लसूण धोकादायक आहे. लसणात असे घटक असतात जे रक्त पातळ करू शकतात. त्यामुळे त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो. 

अधिक वाचा  : Virat Kohli : IPL मध्ये 'किंग' कोहलीचा 'विराट' विक्रम

अ‍ॅलर्जी

काही लोकांना लसूण खाण्याची अ‍ॅलर्जी होत असते. ज्यामुळे सूज येत असते, अंगावर पित्त येत असते. तर काहींना श्वास घेण्यास त्रास होत असतो. लसूण खाल्यानंतर असा काही त्रास होत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

औषधांसोबत खाऊ नये 

लसूण काही औषधांसोबत खाऊ नये. (एचआयव्ही, कर्करोग आणि हृदयरोगाशी संबंधित औषधे) या औषधांसोबत लसूण खाल्यास त्रास होत असतो.  रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत असल्यास लसूण खाऊ नये. 

अधिक वाचा  : 21 व्या वर्षी तुमची कन्या होणार 70 लाख रुपयांची मालकीण

गर्भधारणा आणि स्तनपान

गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करताना लसणाचे सेवन सुरक्षित आहे. परंतु ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.  स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाची निर्मिती कमी होऊ शकते.

श्वासाची दुर्गंधी
 

लसणात अ‍ॅलिसिन नावाचे घटक असता, ज्यामुळे त्याचा वास येतो. लसणाचे सेवन केल्यावर, अ‍ॅलिसिनचे चयापचय होते आणि रक्तप्रवाहात सोडले जातात, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी