Brain Aging signs: तुमचा मेंदू ‘म्हातारा’ होतोय का? सांगतात ही लक्षणं, तिशीनंतर व्हा सावध

आपण वयाने मोठे होतो, तसा आपला मेंदूही वयोवृद्ध होऊ लागतो. मेंदूची क्षमता कमी होऊ लागल्याची काही प्राथमिक लक्षणे आपल्याला दिसतात.

Brain Aging signs
तुमचा मेंदू म्हातारा होतोय का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वाढत्या वयासोबत मेंदूही होत असतो म्हातारा
  • मेंदूची क्षमता कमी झाल्याची दिसतात अनेक लक्षणं
  • उतारवयात वाढतो वागण्यातील तऱ्हेवाईकपणा

Brain Aging Signs: आपण जसजसे मोठे होऊ लागतो आणि आपलं वय (Growing age) वाढू लागतं, तसतसा आपला मेंदूही (Brain) म्हातारा (Older) व्हायला सुरुवात होते. विशेषतः वयाच्या तिशीनंतर आपल्या मेंदूतील काही पेशी आकुंचन पावायला सुरुवात होते आणि साठीपर्यत पोहोचता पोहोचता ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. मेंदूशी संबंधित असणाऱ्या अनेक क्रिया त्यामुळे मंदावतात. गोष्टी लक्षात ठेवणे, एकाग्रता आणि मल्टी टास्किंग यासारख्या गोष्टींची क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, वय वाढत जाईल, तसतसं शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच मेंदूची क्षमताही कमी होत जाते. विशेषतः मेंदूची क्षमता कमी होण्याचा वेग हा इतर अवयवांच्या तुलनेत सर्वाधिक असतो. व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहतात. मात्र मेंदूतील इतर काही घटक मात्र हळूहळू प्रभावहिन व्हायला सुरुवात होते. ही प्रक्रिया आपल्या शरीरात सुरु झाल्याचे काही संकेतही मिळतात. 

विस्मरण

आपण जसजसे साठ वयाकडे झुकू लागतो, तसतशी आपली स्मरणशक्ती कमकुवत व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी घराची किंवा गाडीची किल्ली विसरणे, पासवर्ड विसरणे किंवा एखाद्या मित्राचं नाव विसरणे असे प्रकार घडायला सुरुवात होते. वयाशी संबंधित विस्मरणाच्या घटना या नॉर्मल मानल्या जातात. 

आकलनक्षमता कमी होते

ब्रेन व्हॉल्युम कमी होण्यासोबतच मेंदूच्या पुढच्या भागातील पेशी आकुंचन पावत असतात. त्यामुळे नव्या गोष्टी शिकण्याची मेंदूची क्षमता कमी होते. अगोदर शिकलेल्या गोष्टी विसरून नव्या गोष्टी शिकणं हे उतारवयात आव्हान वाटू लागतं. 

अधिक वाचा - Artificial Eggs:बाजारात मिळणारी बनावट अंडी बिघडवू शकतात तुमचं आरोग्य; कसं ओळखाल बनावट अंडी

निर्णयक्षमतेवर परिणाम

एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेण्याची क्षमताही उतारवयात कमी होऊ लागते. कुठली गोष्ट चांगली आणि वाईट सिद्ध होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची मेंदूची क्षमता कमी होऊन त्याचा निर्णयशक्तीवर परिणाम होत असतो. 

अचानक मूड बदलणे

जसजसं तुमच्या मेंदूचं वय वाढत जातं, मेंदूत होणाऱ्या प्रक्रियादेखील बदलत जातात. तुमचं वय वाढत जाईल, तसतसे तुमचे मूड बदलण्याचं प्रमाण वाढत जाते. 

दृष्टी कमकुवत होणे

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांची क्षमता कमी होत असल्याचं वाटत असेल, तर तेदेखील मेंदू म्हातारा होत चालल्याचं लक्षण मानलं जातं. 

अधिक वाचा - Day Snoring : सावधान! दिवसा घोरणे तुम्हाला बनवू शकते आंधळे, समोर आले नवे संशोधन... लाखो लोकांना धोका!

अँग्झायटी आणि डिप्रेशन

जसजसं तुमचं वय वाढत जाईल, तसतसा तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे उतारवयातील अनेक व्यक्ती तऱ्हेवाईकपणे वागत असल्याचं दिसून येतं. मेंदूतील काही भाग नीट काम करत नसल्याचा हा परिणाम असू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक अनेकदा अतार्किक वागत असल्याचे अनुभव येतात. 

डिस्क्लेमर - मेंदूच्या आरोग्याबाबत सामान्यज्ञानाच्या आधारे नोंदवण्यात आलेली ही काही निरीक्षणे आहेत. तुम्हाला यााबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी