तीन मिनिटांच्या व्यायामापासून मिळेल पूर्ण फायदा, जाणून घ्या सहज मिळणारे हे फायदे

रोज तीन ते पाच मिनिटे हे योगाभ्यास केल्याने आपण तंदुरुस्त राहू शकता. योगतज्ञ सांगतात की कपालभातीमध्ये श्वास बाहेर टाकले जातात. सामान्य पद्धतीनेच श्वास घेतला जातो आणि उच्छवासावर लक्ष दिले जाते.

Breathing exercises
तीन मिनिटांच्या व्यायामापासून मिळेल पूर्ण फायदा, जाणून घ्या सहज मिळणारे हे फायदे  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • कपालभाती प्राणायामामुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती
  • त्वचारोगांशी लढणारे अनुलोम-विलोम प्राणायाम
  • प्राणायाम करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

नवी दिल्ली :   कोरोनाच्या संक्रमणाचा (Corona infection) धोका (danger) वेगाने वाढत आहे. त्यादृष्टीने योगाचा (Yoga) अभ्यास करणे हे गरजेचे आहे. योगात अशा अनेक प्रक्रिया (processes) आहेत ज्याद्वारे आपण आपल्या अंतर्गत आरोग्याचीही (internal health) काळजी घेऊ शकतो. यासाठी दररोज सकाळच्या (morning) वेळी हे व्यायाम (exercises) केल्याने कोरोनापासून (corona) बचाव करण्यासाठी गरजेची असलेली रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढते.

कपालभाती प्राणायामामुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती

रोज तीन ते पाच मिनिटे हा प्राणायाम केल्याने आपण तंदुरुस्त राहू शकता. योगतज्ञ सांगतात की कपालभातीमध्ये श्वास बाहेर टाकले जातात. सामान्य पद्धतीनेच श्वास घेतला जातो आणि उच्छवासावर लक्ष दिले जाते. यावेळी पोट आकुंचित होते. कपालभाती करताना जेव्हा श्वास बाहेर सोडला जातो तेव्हा शरीरातली नकारात्मकताही बाहेर जाते. असे केल्याने हृदय आणि मस्तिष्काचे रोग दूर होतात. तणावापासूनही आराम मिळतो. लठ्ठपमा, मधुमेह अशा समस्यांवरही याचा चांगला परिणाम दिसतो.

त्वचारोगांशी लढणारे अनुलोम-विलोम प्राणायाम

पद्मासनाच्या धारणेत बसून हा प्राणायाम केला जातो. बसताना आपली कंबर आणि मान सरळ ठेवा. आवाज न करता उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला जातो आणि नंतर उजवी नाकपुडी बोटाने बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडला जातो. यामुळे श्वासाशी संबंधित कोणतेही रोग होत नाहीत. रक्त साफ होते. तसेच डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. त्वचारोगांपासूनही मुक्ती मिळते.

प्राणायाम करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

योगाभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जिथे आपण योगाभ्यास करत आहात त्याठिकाणी हवा खेळती असावी. पद्मासन, सिद्धासन आणि वज्रासन हे बसून करावे. अभ्यास करण्यासाठीचा योग्य वेळ हे सकाळी आणि संध्याकाळी आहे. योगाभ्यास हा नेहमी रिकाम्या पोटी करावा. किंवा खाण्यानंतर चार तासांनी करावा. खूप भूक लागली असेल त्यावेळी योगाभ्यास करू नये. योगाभ्यासानंतर शक्य असल्यास आराम करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी