नवी दिल्ली: बऱ्याच महिलांना स्लीव्हलेस ड्रेस (Sleeveless Dress) घालताना समस्या येत असतात. त्या समस्यांमुळे महिला स्लीव्हलेस घालणं टाळतात. त्यातच महिलांचे डार्क अंडरआर्म्स (Dark Armpits) ही मोठी समस्या असते. बऱ्याच महिला डार्क अंडरआर्म्सपासून (Dark Underarms) सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असतात. हीच समस्या घेऊन महिला नेहमीच स्लीव्हलेस ड्रेस घालण्यासाठी टाळाटाळ करतात. पण आता महिलांसाठी या समस्येवर सर्वात सोपे उपाय आज आम्ही सांगणार आहोत.
डार्क अंडरआर्म्समधून महिलांची सुटका करण्यासाठी घरगुती उपाय आहेत ज्यानं खूप फायदा होणार आहे. या समस्येवर काही घरगुती टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
डार्क अंडरआर्म्स कसे स्वच्छ करावे?
सुंदर दिसण्यासाठी महिला स्लीव्हलेस ड्र्रेस घालणं पसंद करतात. मात्र तसा ड्रेस घालतानाही महिलांसमोर बऱ्याच अडचणी येतात. त्यातली मुख्य समस्या म्हणजे डार्क अंडरआर्म्स. या समस्येमुळे महिला आपल्या आवडीचे कपडे घालू शकत नाहीत. जर तुम्हालाही बऱ्याच काळापासून डार्क अंडरआर्म्सच्या समस्येचा सामना करावा लागत असल्यास यासाठी खास टिप्स तुमच्यासाठी अधिक चांगल्या ठरण्याची शक्यता आहे.
कॉफी आणि संत्र
कॉफी आणि संत्र सुद्धा तुमच्या अंडरआर्म्सचा काळसरपणा दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला एक पॅकेट कॉफी घ्यावी लागेल, त्याआधी एक संत्र घ्यावं. त्याचे दोन तुकडे करुन दोन्ही अंडरआर्म्स स्वच्छ करा. त्यानंतर कॉफी पावडरनं रब करा. जवळपास 2-3 मिनटं रब केल्यानंतर पुन्हा एकदा संत्र्यांनी अंडरआर्म्स स्वच्छ करा. शेवटी थंड पाण्यानं अंडरआर्म्स धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा.
लिंबू आणि मध
बऱ्याच काळापासून जर तुम्ही डार्क अंडरआर्म्सचा सामना करत असाल तर तुम्ही लिंबाचा रस आणि मध याचा वापर करा. यासाठी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सला लावा. काही वेळानंतर थंड पाण्यानं धुवा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करुन बघा. तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.
बेसन आणि दही
बेसन आणि दही स्किनसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. चेहऱ्यावर सुरकुत्या घालवण्याकरिताही बेसनाचा बराच वापर केला जातो. पण बेसन आणि दही याची पेस्ट अंडरआर्म्ससाठी खूप फायदेशीर आहे. हा उपाय करताना तुम्हाला थोडं बेसन घेऊन त्यात गुलाबजल आणि दही घालून पेस्ट बनवावी. आता ते तुमच्या अंडरआर्म्सवर लावा. ही पेस्ट सुमारे 10 मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर थंज पाण्यानं धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा. याचा नक्कीच फायदा होईल.