Teeth whitening: पिवळ्या दातांमुळे हसायला पण वाटते लाज; या घरगुती उपायांनी मिळवा पिवळ्या दातांपासून सुटका 

Home remedies । हसणे ही देवाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हसण्यामुळेच आपल्या सौंदर्यात भर पडते, पण निसर्गाने दिलेल्या या देणगीमध्ये काही अडथळे आले की मन अस्वस्थ होते.

Get rid of yellow teeth with these home remedies
या घरगुती उपायांनी मिळवा पिवळ्या दातांपासून सुटका   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लिंबाचा रस पिवळे दात पांढरे करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप जुना आहे.
  • रोज सकाळी कोमट पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्या तरी तुमच्या पिवळ्या दातांचा प्रभाव हळूहळू कमी होतो.
  • पिकलेली स्ट्रॉबेरी दातांवर चोळल्यानेही पिवळेपणा कमी होतो.

Home remedies । मुंबई : हसणे ही देवाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हसण्यामुळेच आपल्या सौंदर्यात भर पडते, पण निसर्गाने दिलेल्या या देणगीमध्ये काही अडथळे आले की मन अस्वस्थ होते. दरम्यान आपण भाष्य करत आहोत पिवळ्या दातांबद्दल ((yellow teeth), ज्यामुळे लोक मोकळेपणाने हसू देखील शकत नाहीत. त्यामुळे आज आपण पिवळ्या दात पांढरे करण्यासाठी काही प्रभावी उपाय पाहणार आहोत. चला तर म जाणून घेऊया त्या घरगुती उपायांबद्दल. (Get rid of yellow teeth with these home remedies). 

अधिक वाचा : बहुप्रतिक्षित चित्रपट पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित

लिंबाचा रस 

पिवळे दात पांढरे करण्यासाठी हा खूप जुना घरगुती उपाय आहे. यासाठी लिंबाच्या रसामध्ये मोहरीचे तेल आणि मीठ मिसळून एक पेस्ट बनवा, नंतर ते लावा आणि ब्रश करा. असे केल्याने पिवळे दात लवकर दूर होतात. तसेच ही क्रिया दररोज केल्यास लवकरच त्याचा परिणाम दिसून येईल. 

सफरचंदाचे साइडर 

तुम्ही एक कप पाण्यात अर्धा चमचा सफरचंद साइडर व्हिनेगर मिसळा, नंतर ब्रशच्या मदतीने दात स्वच्छ घासा. असे केल्याने तुमच्या दातांचा पिवळेपणा लवकर दूर होईल आणि तुमचे दात सुंदर आणि चमकदार होतील. लक्षणीय बाब म्हणजे ही क्रिया दिवसातून फक्त एकदाच करा. 

कोमट पाणी आणि मीठ

तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याच्या गुळण्या केल्या तरी तुमच्या पिवळ्या दातांचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास मदत होईल. यामुळे हिरड्यांच्या संसर्गापासूनही सुटका होईल. 

स्ट्रॉबेरी

पिकलेली स्ट्रॉबेरी दातांवर चोळल्यानेही पिवळेपणा कमी होतो. असे केल्यानंतर दात कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. पांढरे दात येण्यासाठीही हा उपाय खूप प्रभावी आहे. त्याचबरोबर संत्र्याची साल दातांवर चोळल्याने पिवळेपणा दूर होतो आणि दात मजबूत होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी