Weight Loss Story : तू फारच लठ्ठ (Fat) असल्यामुळे आपल्याला तुझी गर्लफ्रेंड (Girlfriend) म्हणून राहण्यात काहीच रस वाटत नाही, असं सांगून तरुणी त्या तरुणाला सोडून गेली. त्यावेळी या तरुणाचं वजन होतं 139 किलो. आपल्या वजनामुळे गर्लफ्रेंड सोडून गेल्याची बाब त्याच्या मनाला इतकी लागली की त्याने वजन कमी करण्याचा (Weight Loss) निश्चय केला. काहीही करून आपलं वजन कमी करायचं आणि गर्लफ्रेंडला आपण किती फिट आहोत, हे दाखवायचं असं ठरवून त्याने जिमला जायला सुरुवात केली आणि वर्षभरातच त्यानं स्वतःला कायापालट करून टाकला. एकेकाळी 139 किलो वजन असणारा हा तरुण आता 69 किलोंचा झाला आहे. म्हणजेच जवळपास अर्धं वजन त्याने कमी केलं आहे. एका टिकटॉक व्हिडिओतून त्याने आपला हा प्रवास मांडला आहे.
Dailystar नं दिलेल्या वृ्त्तानुसार या तरुणाचं नाव आहे पुवी. पुवी एकेकाळी जॅकेट घालत असे. तो अतिशय लठ्ठ होता आणि त्याला आपला बेढबपणा लपवण्यासाठी जॅकेट घालण्याची इच्छा होत असे. त्यावेळी त्याला XXXL साईजचे शर्ट लागत असत. मात्र आता तो L साईजचे कपडे वापरतो. हळूहळू त्याच्या कपड्यांची साईज कमी होत गेली आणि त्याचा फिटनेस वाढत गेला.
वाढलेल्या वजनामुळे गर्लफ्रेंड सोडून गेल्यानंतर काही दिवस पुवी दुःखात होता. पहिले काही दिवस त्याला दुःखातून बाहेर यायला आणि आयुष्याचा वेगळा विचार करायला लागले. त्यानंतर एक दिवस त्याला समजलं की दुःख करत बसल्यामुळे हाती काहीच लागणार नाही. आयुष्यात काहीतरी एक ध्येय बाळगणं आणि त्याचा पाठलाग करत राहणं आवश्यक आहे. ज्या कारणामुळे आपल्या वाट्याला हे दुःख आलं, त्याच्यावर मात करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय त्याने मानलं आणि त्या दिशेनं प्रयत्न सुरू केेले. अगोदर त्याने जिम जॉईन केली आणि कोचच्या मार्गदर्शनासाठी भरपूर व्यायाम करायला सुरुवात केली. दररोज थोडं थोडं वजन कमी करायला त्याने सुरुवात केली आणि नंतर त्याला याची आवडच निर्माण झाली.
अधिक वाचा - Health: गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे
वजन कमी करण्यासाठी व्यायामाला जितकं महत्त्व आहे तितकंच डाएटलादेखील आहे. पुवीनं आपला आहार एकदम नियंत्रित करून टाकला. आहारातून फॅट आणि कार्ब्स असणाऱ्या पदार्थांना सुट्टी दिली आणि प्रोटिन, व्हिटॅमिन आणि फायबर असलेल्या पदार्थांचं प्रमाण वाढवलं. हिरव्या पालेभाज्या, अंडे, चिकन, ब्रेड वगैरे आहार सुरु ठेवला. बघता बघता चमत्कार झाला आणि वर्षभरातच त्याचं रुप बदलून गेलं.
अधिक वाचा - Weight Loss : वजन कमी करण्यासाठी 'या' वेळेत करा जेवण, फटाफट होईल वेटलॉस!
पुवीची केवळ शरीरयष्टीच नव्हे, तर त्याचा चेहरादेखील बदलला आहे. चेहऱ्यावरून जवळचे काही लोकही त्याला ओळखत नसल्याचा अनुभव तो सांगतो. सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे लक्ष्य साध्य केलंच, मात्र त्याला कारणीभूत ठरला तो एक विरह. विरहाच्या दुःखातूनही त्याने सकारात्मक मार्ग शोधला आणि आयुष्य बदलून टाकलं.