ग्लेनमार्कच्या FabiFlu ने होईल कोरोनावर उपचार, पहा कसे काम करते हे औषध

तब्येत पाणी
Updated Jun 22, 2020 | 17:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Glenmark’s Covid-19 FabiFlu Medicine: ग्लेनमार्क कंपनीने फॅबिफ्लू नावाचं औषध बनवले. हे औषध कोरोनाच्या सुरवातीच्या लक्षणांवर मात करत असल्याचा दावा करण्यात आला आहे ३४ गोळ्यांचे संपूर्ण पाकीट ३,५०० रूपये इतके आहे.

 FabiFlu
ग्लेनमार्क FabiFlu   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पेशींमध्ये घुसून व्हायरस रोखू शकते फॅबिफ्लू
  • सुरूवातीलाच औषधांचा करावा वापर
  • १५ दिवसांचा आहे या औषधांचा कोर्स

मुंबई:  अँटीव्हायरल ड्रग favipiravir ला ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने FabiFlu नावाने मार्केटमध्ये आणले आहे. हे औषध कोरोनाच्या सुरवातीच्या लक्षणांवर मात करते. कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी पहिले औषध भारतीय बाजारात दाखल झाले आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोविड १९ साठी अँटीव्हायरल औषध फेव्हिपिराविर बनवण्यासाठी आणि मार्केटिंगसाठी परवानगी मिळाली आहे.

कंपनीने फॅबिफ्लू नावाने हे औषध बनवले. ३४ गोळ्यांचे संपूर्ण पाकीट३,५०० रूपये इतके आहे. हे औषध माईल्ड ते मॉडरेट लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाते. हे औषध रुग्णालये आणि प्रिस्क्रिप्शनच्या मदतीने मेडिकल स्टोर्समध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या कसा होतो याचा परिणाम

पेशींमध्ये घुसून व्हायरस रोखू शकते फॅबिफ्लू

ग्लेनमार्कने सर्वात कमी लक्षणे असलेल्या ९० आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णावर याची चाचणी घेण्यात आली. हे औषध रुग्णांच्या पेशींमध्ये घुसले आणि व्हायरल लोड कमी करण्यासाठी व्हायरसला आपली कॉपी बनवण्यापासून रोखते. याचाच अर्थ संक्रमणाच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात व्हायरसचा फैलाव होणे रोखते.

सुरूवातीलाच औषधांचा करावा वापर

रिसर्चस यांच्या मते फॅबिफ्लूचा वापर हा सुरूवातीच्याच स्टेजला करणे गरजेचे आहे. तरच या गोळ्यांचा प्रभाव होऊ शकतो. कारण त्यानंतरच्या स्टेजमध्ये व्हायरस रेप्लिकेशनचा वेग कमी होतो. शरीरासाठी धोकदायक इम्युन रेस्पांस अनेक प्रकारच्या तक्रारींना जन्म देतो आणि अवयव निकामी होतात.

१५ दिवसंचा आहे या औषधांचा कोर्स

कंपनीच्या मते रुग्णाला पहिया दिवशी २००एमजीच्या ९ गोळ्या दिल्या जातील. पुढील दिवशी २०० एमजीच्या ४-४ औषध देऊन परिस्थिती मॉनिटर केले जईल. क्लिनिकल ट्रायलच्या निकालानुसार ८० टक्के रुग्णांवर याचा थेट परिणाम दिसेल.

रुग्णाला लिहून द्यावे लागेल

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला महामारी दरम्यान इर्मजन्सी कॅटेगरीमध्ये सामील केले आहे. यातच रुग्णांना गोळी घेण्याआधी अंडरटेकिंग करावे लागेल.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जता आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत देशांत ४४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर देशभरात एका दिवसांत १४८२१ नवे रुग्ण आढळून आले. भारतात आतापर्यंत एकूण ४,२५,२८२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आहेत. भारतात आतापर्यंत १३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ४ लाख २५ हजारांच्या देखील पुढे गेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी